गूगल प्ले स्टोअर वरून ‘हे’ अ‍ॅप डाउनलोड करा आणि घरी बसून रेशन बुक करा

0

रेशनकार्डधारकांसाठी केंद्र सरकारने एक मोठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आता त्याला रेशन मिळण्यासाठी दुकानात लांबलचक लाईन लावावी लागणार नाही, कारण आता तो घरी बसून आपल्या मोबाइलच्या मदतीने रेशन बुक करू शकेल.

खरं तर, केंद्र सरकारने रेशन कार्ड धाकरकांसाठी  मेरा राशन अ‍ॅप लाँच केले गेले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने रेशन मिळविणे खूप सोपे होईल. वन नेशन वन रेशन कार्ड योजना भारत सरकारने सुरू केली आहे, त्यापैकी मेरा राशन अ‍ॅप हा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण घरी बसून मेरा राशन अ‍ॅपच्या सहाय्याने आपण रेशन कसे बुक करू शकता हे जाणून घ्या

मेरा राशन अ‍ॅप डाउनलोड कसे करावे?

– आपण प्रथम Google Play Store वर जाणे आवश्यक आहे.

– येथे शोध बॉक्समध्ये मेरा रेशन अ‍ॅप टाका .

– यानंतर मेरा रेशन अ‍ॅप डाउनलोड करा.

– त्यानंतर मेरा राशन अ‍ॅप इंस्टॉल करा.

मेरा राशन अ‍ॅप कसे वापरावे?

– आता मेरा राशन अ‍ॅप ओपन करा.

–  आपल्या राशन कार्डची डिटेलच्या आधारे रजिस्ट्रेशन करा

मेरा राशन अ‍ॅपचे फायदे

– या अ‍ॅपचा प्रवासी लोकांना अधिक फायदा होईल.

– रेशन शॉपची अचूक माहिती मिळेल.

– अ‍ॅपच्या मदतीने रेशनकार्ड धारकदेखील आपल्या सूचना देऊ शकतात.

– याद्वारे रेशनकार्डधारकांना अन्नधान्यांची माहिती स्वतःच मिळू शकेल.

आपले जवळचे स्टोअर कसे शोधायचे?

मेरा राशन अ‍ॅपच्या मदतीने, टॅप करून जवळच्या उचित किंमतीचे दुकान मिळू शकेल. या व्यतिरिक्त आपण आपली पात्रता आणि रेशन व्यवहाराची माहिती देखील पाहू शकता.

मेरा राशन अ‍ॅप 14 भाषांमध्ये उपलब्ध असेल

सध्या हा अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे, परंतु लवकरच ते अन्य 14 भाषांमध्ये उपलब्ध होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला दुकानातील रेशन कधी व कोणाकडून घेतले गेले याचीही माहिती मिळेल.

महत्वाच्या बातम्या : –

हिरव्या बीन्स खाण्याचे ‘हे’ 7 उत्तम फायदे जाणून घ्या

तुम्ही विचारही केला नसेल कधी पण उसाचा रस देतो इतके फायदे, एकदा नक्की वाचा

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर, पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सर्दी-खोकल्यापासून, वजन कमी करण्यापर्यंत करवंद खाण्याचे असंख्य फायदे….

दिल्ली सीमेवर पक्की घरे बांधल्यानंतर आता शेती केली जाईल, जाणून घ्या यामागील कारण

Leave a comment