ढोबळी मिरचीला होणारे रोग आणि त्यावरील उपाय
शाकाहारी लोकांच्या आहारात अन्नधान्याच्या खालोखाल भाजीपाल्याचे महत्व आहे. भाजीपाल्यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह ही खनिजद्रव्ये विपुल प्रमाणात असतात . शरीराची योग्य वाढ होण्यासाठी सदर द्रव्यांची गरज असते. भाजीपाल्यातून अ आणि क जीवनसत्वे मोठया प्रमाणात मिळतात. त्यामुळे आहारात भाजीपाल्यास महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे शेतकरी व्यापारी तत्वावर भाजीपाला लागवडीकडे वळला आहे.
रोग
• रोपे कोलमडणे
लक्षणे : ढोबळी मिरची पिकात जमिनीतील पिथियम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे रोपवाटिकेत रोपे कोलमडणे हा रोग आढळून येतो. यामध्ये दोन प्रकारचा रोपांचा मर आढळून येतो. यातील पहिला मर हा बियाणे उगवून जमिनीबाहेर येण्यापूर्वीच रोपे मरतात, बियाणे कुजते.दुसरा मर रोपे उगवून जमिनीबाहेर आल्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव झालेल्या रोपांची खोडे जमिनीलगत फिक्कट हिरवट आणि पानथळ तपकिरी दिसतात. पाने निस्तेज, पिवळसर दिसतात. खोडाचा जमिनीलगतचा भाग कुजून रोग खोडावर आणि मुळांकडे पसरत जाऊन, कुजून अचानक कोलमडतात.
उपाय – रुटगार्ड – १ लिटर + सिलिस्टिक – १०० मिली (प्रति एकर)
• अनुकूल परिस्थिती : जमिनीतील जास्त ओलावा तसेच जास्त तापमान. रोपवाटिकेची जमिन निचरा होणारी नसते, कमी निच-याची असणे. रोग बळावण्यासाठी ७५ ते ८५० फॅरनहाईट असे अनुकूल तापमान असणे. पाणी साठून राहणे, बियाणे दाट पेरणे यामुळे रोग बळावतो. या बुरशीचे बीजाणू बरेच महिने जमिनीत राहतात .योग्य ओलावा मिळताच त्यांचा प्रसार होऊन रोपांना प्रादुर्भाव करतात.
• भुरी (रोगकारक बुरशी : लेव्हेलुला टावरिका ) : सुरुवातीला पानाच्या पृष्ठभागावर पिवळसर ठिपके दिसून येतात आणि पानाच्या खालच्या बाजूस पिठाप्रमाणे पांढ-या बुरशीची वाढ झालेली दिसते. कोरडया हवामानात रोगाचे प्रमाण संपूर्ण पानावर वाढते, पाने पिवळसर होऊन कोमजल्यासारखी होतात आणि गळतात. तसेच फुलगळ मोठया प्रमाणात होते. रोगामुळे पानाची वाढ होत नाही तसेच कमी प्रतीची फळे मिळतात. उष्ण आणि कोरडे ते दमट हवामानात रोगाची वाढ झपाटयाने होते.
उपाय – पी.एम.प्रोटेक्ट – १ मिली प्रति लिटर पाणी
• पानावरील ठिपके करपा (अल्टरनेरिया सोलॅनी) : मुळे पानावर आणि फळांवर तपकिरी ते काळया रंगाचे गोल ते आकारहीन डाग पडतात. डागामध्ये एकात एक अशी गोलाकार वलये असतात. त्यामुळे पाने करपतात. फळांवर या रोगाचे प्रमाण जास्त दिसून येते. फळांच्या ठिपक्यांवर काळपट बुरशीची वाढ झालेली दिसते. अशी फळे सडतात. रोग फांद्या, खोडावर पसरुन, रोगट ठिकाणी फांद्या आणि खोड मोडते. सततचा पाऊस, आर्द्रता जास्त असेल असे वातावरण रोग वाढीस अनुकूल असते, तसेच रासायनिक खतांच्या अति वापरामुळे रोगाचे प्रमाण वाढते.
उपाय – सिफॉन – १.५ ते २ मिली मिली प्रति लिटर पाणी.
• सरकोस्पोरा करपा – सरकोस्पोरा नावाच्या बुरशीकडे पानावर गोलाकार ते आकारहिन ठिपके पडतात. या ठिपक्यांचा मध्यभाग फिक्कट सफेद आणि कडा गर्द तपकिरी रंंगाच्या असतात. या रोगाला फ्रॉग आय लिफ स्पॉट असेही म्हणतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढून असंख्य ठिपके एकत्र मिसळून पाने पिवळी पडून करपतात व गळतात. या रोगाचा प्रसार बियाण्यामार्फत तसेच रोगग्रस्त अवशेषांमार्फत होतो.
उपाय – सिफॉन – १.५ ते २ मिली मिली प्रति लिटर पाणी.
• कोलेटोट्रिकम बुरशी : कोलेटोट्रिकम कॅप्सिसी : पिकलेल्या अगर पक्वतेच्या जवळ असलेल्या फळांवर वलयांकित, गोलाकार, मोठया आकाराचे गर्द तपकिरी ते काळपट ठिपके/चट्टे येतात. त्यामुळे फळांची शुष्क कुज होते. पावसाळयानंतर रोगाचे प्रमाण अधिक वाढते. रोग बियाण्यांमार्फत होतो आणि रोगग्रस्त अवशेषांमार्फत पावसाळी हवेत झपाटयाने पसरतो. २८० सें. तापमान आणि ९५ टक्के आर्द्रता असे हवामान रोग वाढीस अनुकूल असते.
उपाय – यु.एस.झायटॉप – २ मिली प्रति लिटर पाणी
• मर रोग : रोगकारक बुरशी :फ्युजॅरियम ऑक्झीस्पोरम सोलॅनी .या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडाची वाढ खुंटते. पाने वरच्या बाजूला आत वाळल्यासारखी होऊन पिवळी दिसतात व गळून पडतात आणि मुळे कुजून झाड मरते. खोडाचा आतील भाग उभा कापून निरीक्षण केल्यास तपकिरी रंगाचा दिसतो. कमी निच-याची जमीन, जमीनीतील जास्त ओलावा, जास्त तापमान यामुळे रोग जास्त बळावतो.
उपाय – सिफॉन – १.५ ते २ मिली + सिलिस्टिक – ०.३० मिली प्रति लिटर पाणी
• खोड कुज (पिथियम, स्लेरोशियम आणि रायझोक्टोनिया) : जमिनीतील बुरशींच्या प्रादुर्भावामुळे ढोबळी मिरची पिकात अलीकडे खोडकूज रोगाचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. रोपवाटिकेत जर पिथियम बुरशीचा प्रादुर्भाव झालेला असेल आणि प्रादुर्भावग्रस्त रोपे लावली तर, लागवडीनंतर ८-१५ दिवसांत जमिनीलगतचा भाग कुजून झाडे उन्मळून पडतात.
उपाय – पेनिट्रेटर – २ मिली प्रति लिटर पाणी
• स्लेरोशियम मर : स्लेरोशियम रोल्फसाय नावाच्या बुरशीमुळे झाडाचे खोड जमिनीलगत ओलसर तपकिरी होऊन सडते. ढोबळी मिरचीची काही झाडे अचानक मरतात, रोगग्रस्त झाडाची पाने नंतर पिवळी होतात. जमिनीलगतच्या खोडावर पांढ-या बुरशीची वाढ झालेली दिसते. या ठिकाणी मोहरीच्या दाण्याप्रमाणे पांढरट-तपकिरी बुरशीच्या गाठी दिसतात. तसेच रायझोक्टोनिया या बुरशीमुळे झाड बुंध्याजवळ कुजते आणि त्यावर बुरशीची पांढरी वाढ होते. स्लेरोशियम किंवा रायझोक्टोनिया बुरशीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण झाड सुकून मरुन जाते. या रोगाचा प्रादुर्भाव कमी निच-याच्या भारी जमिनीत जास्त असतो, तसेच पिकास खोडाच्या भागापर्यंत भर दिल्यास खोडाचा भाग मातीच्या संपर्कात येऊन जमिनीतील, वरील हानिकारक बुरशींचा प्रादुर्भाव होऊन खोडकूज रोगाचे प्रमाण वाढते.
उपाय – रामबाण – १ लिटर एकरी किंवा रुटगार्ड – १ लिटर + सिलिस्टिक – १०० मिली प्रति एकरी
• जीवाणूजन्य ठिपके (झान्थोमोनास कॅम्पेस्ट्रीस) : या जीवाणूमुळे रोगाचा प्रादुर्भाव पाने, फांदी आणि फळांवर आढळून येतो. लहान, गोलाकार ते वेडेवाकडे पानथळ डाग पानाच्या खालच्या बाजूस येतात. नंतर या डागांचा मध्यभाग काळा असलेले कडा गर्द हिरवट-करडया रंगाचे असणारे डाग दिसतात आणि या डागाच्या कडा पिवळया रंगाच्या असतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढून पाने करपतात. हिरव्या फळांवर कडा पानथळ असणारे, उंचवटयासारखे डाग फळांवर येतात. पूर्ण वाढलेले डाग तपकिरी-काळपट दिसतात. रोगाचा प्रसार रोगाचे रोगग्रस्त अवशेष आणि बियाणांव्दारे होतो आणि पाण्यामार्फत रोगाचा प्रसार वेगाने होतो.
उपाय – सिफॉन – १.५ ते २ मिली + सिलिस्टिक – ०.३० मिली प्रति लिटर पाणी
• बोकडया किंवा चुरडा-मुरडा :
लक्षणे : या रोगाचा प्रसार पांढ-या माशीमुळे होतो. पानाच्या शिरांमधील भागावर सुरकत्या पडून संपूर्ण पानाची वाढ खुंटते. पाने लहान आकाराची, वळलेली, आकसलेली आणि फिक्कट पिवळी होतात. झाडाची वाढ खुंटते व ते बोकडल्यासारखे दिसते. अशा रोगट झाडांना फळे लागत नाहीत, लागलीच तर लहान आकाराची आणि फार कमी प्रमाणात असतात. या रोगाचे वेळीच नियंत्रण न केल्यास संपूर्ण पीक वाया जाते व उत्पादनात घट येते.
उपाय – प्रिव्हेंटर – १ मिली + सिलिस्टिक – ०.३० मिली प्रति लिटर पाणी
उपाय :
१. निरोगी बियाण्याची निवड : भाजीपाला पिकात बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि काही थोडया विषाणूजन्य रेागांचा प्रसार बियाण्यांमार्फत होत असतो. रोगविरहीत बियाणे ओळखणे किंवा निवडणे कठीण आहे म्हणून प्रमाणित केलेले बियाणे वापरावे किंवा भाजीपाला पिकातील बियाणे धरतांना सुरुवातीच्या काढणीतील रोगमुक्त झाडांचे / फळांचे बी धरावे. ज्या शेतात रेागाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणचे बी शक्यतो निवडावेत.
२. रोपवाटिका : भाजीपाल्याची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करणे अतिशय महत्वाचे आहे. वाफ्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत कंपोस्ट खत २ पाटया व ४० ते ५० ग्रॅम ब्लायटॉक्स / ब्ल्युकॉपर चांगले मातीत मिसळावे. त्यानंतर औषधे लावलेले बी ओळीमध्ये पातळ पेरावे. प्रत्येक २ x १ मीटरच्या वाफ्यास २५ ग्रॅम फोरेट हे दाणेदार औषध बियाच्या दोन ओळीमध्ये घालावे मात्र फोरेट औषधाचा आणि बियांचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. पेरणीनंतर पाणी वेळेवर व योग्य द्यावे. बी दाट पेरल्यास व पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास रोपे कोलमडणे या रोगाचा प्रादुर्भाव हमखास होतो. बियाण्याची उगवण होईपर्यंत झारीने पाणी द्यावे. हवा खेळती राहण्यासाठी वरचेवर खुरपणी करुन वाफे स्वच्छ व भुसभुशीत ठेवावीत. गरज भासल्यास बी उगवणीनंतर १५ ते १८ दिवसांनी १५ ग्रॅम ब्लूफोर प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी द्यावी.
३. वरील रोगांच्या एकत्रित नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे काळजी घेतल्यास पीक निरोगी राहून उत्पादनात भरघोस वाढ होते.
१. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ३ ग्रॅम किंवा सीबीझेड 50 – २ ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
२. वाफ्यामध्ये बी पेरतेवेळी पूर्वी सांगितल्याप्रमाणे २५ ग्रॅम फोरेट हे दाणेदार औषध प्रति वाफ्यास द्यावे.
३. रोपे तयार झाल्यानंतर ती २५ ग्रॅम डायथेन एम-४५, ३० ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक व १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व या द्रावणात रोपे साधारण ५ मिनिटे बुडवून नंतर लागण करावी.
४. लागवडीनंतर १० दिवसांनी फोरेट हे औषध पति हेक्टरी १० किलो याप्रमाणे चंद्राकार कोरी घेऊन प्रत्येक झाडास चिमूटभर द्यावे.
५. लागवडीनंतर ४५ दिवसांनी १५०० ग्रॅम डायथेन एम -४५, १५०० ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक व ५०० लिटर पाण्यात मिसळून दर १० दिवसांनी फवारणी करावी. साधारण ३ ते ४ फवारण्या कराव्यात.
६. भुरी रेागाचा प्रादुर्भाव आढळल्यास पी.एम.प्रोटेक्ट १ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.