बटाटा पिकावरील रोग व व्यवस्थापन
बटाटा पिकावरील विषाणूजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन योजना :
बटाटा पिकात मावा व तुडतुडे या विषाणूजन्य रोगाच्या दुय्यम प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या किडीचे योग्य निदान करून खालील निर्देशीत कोणत्याही एका कीटकनाशकांचा प्रादुर्भावानुसार गरज असेल तर तरच वापर करून मावा व तुडतुडे या किडीचे व्यवस्थापन करावे Thiamethoxam 25% WG 2 ते 3 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी किंवा Methyl dematon 25 % EC 10 मिली अधिक दहा लिटर पाणी
यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची मावा व तुडतुडे या किडीच्या व्यवस्थापनासाठी व त्यापासून पुढे होणाऱ्या विषाणूजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार योग्य निदान करून गरजेनुसार फवारणी करावी.
बटाट्याची लागवड करताना विषाणूजन्य रोगाचा प्रतिबंध करण्याकरिता रोगमुक्त बियाण्याचा म्हणजेच रोगमुक्त बटाट्याचा वापर करावा.
विषाणूजन्य रोगाची लक्षणे बटाटा पिकात दिसताच पहिले एकटे दुकटे रोगट झाड उपटून नष्ट करावे.
बटाट्याचे शेत तणविरहित ठेवावे तसेच पिकांची फेरपालट करावी.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी
१. रसायनाची फवारणी करताना लेबल क्लेम शिफारशीची शहनिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे रसायनाचा वापर करावा.
२. रसायनाची फवारणी करताना अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी व प्रमाण पाळावे.
३. रसायनाची फवारणी करताना सुरक्षित कीटकनाशक फवारणी तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा तसेच फवारणी करताना सुरक्षा किटस चा वापर करावा.
महत्वाच्या बातम्या : –
फळाचे सालही आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतात
लाल सफरचंद किंवा हिरवे सफरचंद, आपल्या आरोग्यासाठी काय फायदेशीर आहे?
२०२० इतिहासातील सर्वाधिक उष्ण वर्ष