राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दररोज वाढ

0

राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही सुरूच आहे. पण त्यात आता एक दिलासादायक बाब समोर अली आहे ती  म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याचे आपल्यला पहायला मिळत आहे. गेल्या २४ तासतात महाराष्ट्रात ३ हजार ०८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ९५.२५ टक्के झाले आहे. आतापर्यंत राज्यात १९ लाख १५ हजार ३४४ जणांनी करोनावर मात केली आहे.

तर गेल्या २४ तासात राज्यात नव्याने १ हजार ८४२ नवे कोरनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर गेल्या २४ तासतात ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २० लाख १० हजार ९४८ वर पोहचली आहे. याशिवाय आता राज्यात केवळ ४३ हजार ५६१ सक्रिय रूग्ण आहेत. तर, आतापर्यंत ५० हजार ८१५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे.

महत्वाच्या बातम्या : –

रॅली संपायला तीन दिवस देखील लागू शकतात

… म्हणून राज्यपाल शेतकऱ्यांना भेटू शकले नाहीत, राजभवनाचे स्पष्टीकरण

राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही – शरद पवार

मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नसून काही पक्ष ढोंगबाजी करत आहेत ;फडणवीसांचा आरोप

गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक

Leave a comment