दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत वाल, घेवड्याच्या दरात सुधारणा
अहमदनगरमधील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्यातील वाल, घेवड्याच्या दरात सुधारणा कायम असल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात घेवड्याची ६ ते आठ क्विंटलची आवक झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रतिक्विंटल २ हजार ते ३ हजारांचा दर मिळाला.
तर दुरसीकडे वालची ७ ते १० क्विंटलची आवक झाली असल्याची माहिती देण्यात आली असून प्रतिक्विंटल ३ ते ४ हजार रुपयांचा दर मिळाला.
भुसारमध्ये तूर, सोयाबीनची आवक होत आहे. तुरीची दररोज २०० ते १३० क्विंटलची आवक होत असून ५४०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक स्थिर राहिली. हिरव्या मिरचीची आवक कायम असून दरात सुधारणा झाली आहे. गेल्या आठवड्यात दर दिवसाला ३५ ते ४० क्विंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते ४ हजार रुपये, बटाट्याची २४५ ते २६० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते २ हजार १०० रुपयाचा दर मिळाला.
मुगाची २० ते २५ क्विंटलची आवक होऊन ४८०० ते ६ हजार १०० रुपयाचा तर सोयाबीनची ४५ ते ५० क्विंटलची आवक होऊन ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयाचा दर मिळाला.
तर शिमला मिरचीची ३० ते ३५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार, दुधी भोपळ्याची २५ ते ३० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजार रुपये,कारल्याची दर दिवसाला १७ ते २० क्विंटलची आवक झाली. २ हजार ते ३ हजार रुपयाचा दर मिळाला. दोडक्याची १७ ते २० क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ३ हजार रुपयाचा दर मिळाला.
आल्याची दर दिवसाला १५ ते २० क्विंटलची आवक झाली. १ हजार ५०० ते २ हजार ५०० रुपये, शेवग्याची ५ ते ७ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ६ हजार रुपये दर मिळाला.काकडीची २५ ते ३० क्विंटलची आवक होऊन ८०० ते १२०० रुपये दर मिळाला.
महत्वाच्या बातम्या : –
शेतकरी – सरकारमधील चर्चा पुन्हा निष्फळ, 8 जानेवारीला पुढची बैठक
… अन् शेतकऱ्यांनी भाजप नेत्याच्या घरासमोर टाकले शेण
रब्बी ज्वारीची सुधारित लागवड पद्धत
नवीन तंत्रज्ञानाने शेती करुन तीन वर्षात फुलले शेतकऱ्याचे नशीब
नैसर्गिकरित्या करूयात पीकामधील कीड नियंत्रण