दादा भुसे यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची केली पाहणी

0

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील चांदवड व दिंडोरी तालुक्यात नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली.

या नुकसानीचा अहवाल सरकारला सादर करण्याचेही त्यांनी यंत्रणेला आदेश दिले. ‘‘अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू,’’ अशी ग्वाही भुसे यांनी या वेळी दिली.

पीकविम्याबाबत राज्य शासन केंद्राच्या मदतीने लवकरच नवीन धोरण हाती घेणार आहे. केंद्र सरकारची विमा कंपनी स्थापन होणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. ते चांदवड तालुक्यातील धोतरखेडे येथील ईश्वर महाले या शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकऱ्यांशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, ‘‘नुकसानग्रस्त सर्वच बागांचे पंचनामे करण्यात येतील. शासन कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही.’’ तातडीने द्राक्ष बागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

भुसे यांनी कोरोनातून बरे होताच मंगळवारी  थेट पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. त्यांच्यासमवेत चांदवड- देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर, माजी आमदार धनराज महाले, उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ वाघ, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या : –

सुधारित तंत्राने करा बटाटा लागवड

भारतीय गायींच्या ‘या’ जातींना दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मागणी

पुढील दोन ते तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार

कांदा पिकावरील विविध रोगांची लक्षणे रोगास प्रतिकूल उपाय या संबंधीची माहिती

जाणून घ्या कश्याप्रकारे योग्य खते निवडावी

 

Leave a comment