गुणकारी आणि औषधी हरभरा

0

साधारणपणे हिवाळ्यात कोवळा हरभरा येतो. हरभऱ्याचे घाटे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. त्यापासून विविध पदार्थदेखील रुचकर होतात. त्यामुळे गृहिणींमध्ये हरभरा विशेष प्रिय असतो.

त्याचे पीठ, फुटाणे असे विविध पदार्थ तयार करता येतात. असा हा हरभरा औषध म्हणूनही उत्तम काम करतो. हरभऱ्याची आंब पचनावर उत्तम कार्य करते. अजीर्ण, अपचन, गॅसेससाठी उपयोगी असते.

▪️ हरभरा पौष्टिक असल्याने अशक्तपणामध्ये जरूर खावा. कोवळे हरभरे भाजून खावेत.
▪️ हरभऱ्याच्या डाळीचे पीठ, साय, दूध, हळद, मध हे मिश्रण चेहऱ्याला लेप स्वरूपात लावून वाळले की काढून टाकावे. यामुळे त्वचेचा रंग आणि पोत सुधारतो.
▪️ त्वचेच्या खाजेसाठी साबण बंद करून अंघोळीच्या वेळी हरभऱ्याचे पीठ दुधात कालवून लावावे.
▪️ बऱ्याचदा सर्दी वारंवार होणे, घशामध्ये कफाचा चिकटा असणे, घसा खाकरावा लागणे अशा तक्रारी असतात. अशा वेळी फुटाणे पाच-सहा प्रमाणात दोन-तीन वेळा सेवन करावेत. पण त्यावर पाणी पिऊ नये.
▪️ रात्री कफाचा खोकला असल्यास फुटाणे सेवन करून झोपल्यास कफ कमी होतो. घसा मोकळा होतो. अर्थातच कफ कमी करण्यासाठी औषधे जोडीला हवीतच.
▪️ हरभरे भिजत घालून त्याला मोड आणून सेवन केल्यास शक्तिवर्धक म्हणून काम करतात.
▪️ सर्दी खूप झाल्यास, नाक सारखे वाहत असल्यास रोज फुटाणे सेवन करावेत. त्याचा फायदा होतो.
▪️ हरभरा औषधी असला तरी पचायला जड असतो. विशेषतः पीठ, भिजवलेली डाळ या गोष्टींनी पोट जड होते. म्हणून पचनशक्ती उत्तम असणाऱ्या लोकांनी हरभरा सेवन केल्यास
▪️ शक्तिवर्धक म्हणून काम होते. हे महत्त्वाचे जरूर लक्षात ठेवावे.

महत्वाच्या बातम्या : –

आज होणारी ट्रॅक्टर मार्चवरील सुनावणी तहकूब

स्वीट कॉर्न लागवडीसाठी अनुदान कसे मिळवायचे ते जाणून घेऊया

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी

गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची सुमारे ९० ट्रक आवक

 

Leave a comment