काकडी पीक व्यवस्थापन

0

वेलवर्गीय फळांमध्ये काकडीला अनन्यसाधारण महत्त्व असून, वाढणार्‍या उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी दुपारच्या कडक उन्हामुळे लागणारी तहान भागविण्यासाठी एस.टी. स्टँडवरती पुष्कळ लोक (प्रवासी) काकडी खाताना दिसतात. उच्च व मध्यमवर्गीय लोकांमध्ये काकडीचा उपयोग प्रकृतीस्वास्थ्यासाठी, सौंदर्यप्रसाधनासाठी म्हणून प्रचलित आहे हे आपण टी. व्ही. वरील जाहिरातीद्वारे पाहतोच आहे. कृत्रिम, रासायनिक औषधांपासून तयार केलेल्या कॉस्मेटिक्समुळे त्वचेवरील नंतर होणार्‍या वाईट परिणामांची भीती असणार नाही.

सध्याच्या परिस्थितीमध्ये उन्हाळा कधी असतो असे म्हणण्यापेक्षा उन्हाळा कधी नसतो असे म्हणण्याची वेळ आली आहे. कच्छच्या वाळवंटातील ‘केट्टा’ सारखी अनेक बेटे वाढत्या तापमानामुळे तळपत असताना दिसतात. भारतामध्ये खानदेश, विदर्भ, नंदुरबार, मराठवाडा, मद्रास, ओरिसा, कर्नाटक भागांमध्ये अशा प्रकारचा सनस्ट्रोक टाळण्यासाठी, तसेच अॅसिडीटी, कॉन्सिटिपेशन कमी करण्यासाठी ‘काकडी’ अत्यंत गुणकारी आहे.असे बहुगुणी परंतु शेतकर्‍याचे कमी लक्ष असलेले बर्‍यापैकी पैसा देणारे वेलवर्गीय पीक म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आहारातील महत्त्व :

काकडी पिकाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात पुढीलप्रमाणे अन्नद्रव्ये असतात.

पाणी – ९६.३० %, कर्बोहायड्रेट्स – २.५०%, प्रोटीन्स – ०.४०%, फॅट्स – ०.१०%, तंतुमय पदार्थ – ०. ४० %, खनिजे – ०.३०%, कॅल्शिअम – ०.०१%, फॉस्फरस – ०.०३%, लोह – ०.००२%, जीवनसत्त्व ‘क’ – ०.००७%, उष्मांक (कॅलरी) -१३.

काकडीचे पीक महाराष्ट्रात बहुतेक सर्वच जिल्ह्यांत आणि विशेषत: मोठ्या शहरांच्या जवळ वर्षभर मागणी असल्याने मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

महत्वाच्या बातम्या : –

तेजपानचे फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, एकदा वाचाच

रासायनिक शेतीचे दुष्परीणाम

आसाम चहाशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी वाचा

सफरचंदांचे जास्त सेवन आपल्याला आजारी बनवू शकते, त्याचे नुकसान जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, या खतांच्या किंमती वाढणार नाहीत, नवीनतम दर जाणून घ्या

Leave a comment