महापंचायतीस लाखो शेतकऱ्यांची गर्दी

0

सिंघू, टिकरी आणि गाजीपूर सीमा आहे तशाच अडविल्या जातील, सोबतच देशभर महापंचायत आयोजित करून ‘आता पेटवू सारे रान’चा बिगुल शेतकरी नेत्यांनी फुंकला आहे. आज कुरुक्षेत्रात झालेल्या महापंचायतीला लाखावर शेतकरी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. मात्र या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. तसेच आंदोलकांनी काहीवेळासाठी लाल किल्ला देखील ताब्यात घेतला होता. आता या प्रकरणी आरोपी पंजाबी गायक-अभिनेता दीप सिद्धू याला अखेर अटक करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते. तेव्हापासून दीप सिद्धूचा दिल्ली पोलीस शोध घेत होते. पोलिसांनी दीप सिद्धूवर एक लाखांचे इनाम देखील घोषित केले होते. आता अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. ट्रॅक्टर रॅली दरम्यान शेतकऱ्यांना भडकवण्याचा त्याच्यावर आरोप आहे.

सिद्धू १४ दिवसांपासून फरार होता. पोलिसांनी त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पोलीस मुख्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पेशल सेलच्या पथकाने त्याला पंजाबमधील झिरकपूर या भागातून अटक करण्यात आली आहे.

जे शेतकरी सिंघू, टिकरी, गाजीपूर आणि अन्य सीमांवर आहेत, ते तिथेच थांबतील. मात्र, शेतकरी नेते देशभर महापंचायतीचे आयोजन करतील. महाराष्ट्रातून संदीप गिड्डे पाटील, युद्धवीर सिंग हेही मार्गदर्शक होते. राकेश टिकैत हे आता केंद्रस्थानी आहेत. त्यांना विविध ठिकाणांहून सभेसाठी आमंत्रित केले जाते. येत्या २० फेबु्वारीला महाराष्ट्रात भव्य सभा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती संदीप गिड्डे पाटील यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या : –

लागवडीचा खर्च वाढल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांना रडविले

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय,शेतकऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ लाखांचे बिनव्याजी पीककर्ज

कार्ली व दोडका लागवड मार्गदर्शन

कांदा पिक मार्गदर्शन

निमेटोड व मर रोगाचे नियंत्रण

 

Leave a comment