पीक विमा कंपन्यांनी फिरवली शेतकऱ्यांकडे पाठ

0

परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुस्कान केले. यावर्षी नागभीड तालुक्यात अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर मावा, तुडतुडा,करपा यासारख्या विविध रोगांनी धान पीक पार नेस्तनाबूत केले. प्रत्येक गावातील जाहीर करण्यात आलेली शासकीय पैसेवारीही ५० टक्क्याच्या आत आहे. असे असूनही पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. हे शेतकरी आता पीक विम्याची मागणी करू लागले आहेत.

नागभीड येथील काही शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला. पण हे अधिकारी कोणतीच दाद देत नसल्याची माहिती समोर आली आहे.नागभीडमध्ये धानाचे एकमेव पीक घेतले जातात. एकूण क्षेत्रफळापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात हे पीक घेण्यात येते.

आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने हे पीक घेण्यासाठी शेतकरी गावातील सेवा सहकारी आणि आदिवासी विविध कार्यकारी संस्था या सोसायट्यांमार्फत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्जाची उचल करीत असतात. हे कर्ज उचलत असताना कर्जाऊ रकमेतून जिल्हा मध्यवर्ती बँक पीक विम्याचा प्रति एकरी ३५० रूपये हप्ता कपात करून विमा कंपनीकडे हप्त्याची रक्कम जमा करीत असते.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचाच विचार करता ही बँक दरवर्षी सहा ते सात हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देत असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या : –

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाट्याची १२९ ते ३८७ क्‍विंटल आवक

आजपासून लसीकरणाला सुरुवात

‘कोणी काही करू शकणार नाही, अशा भ्रमात राहू नका’

कारले लागवड पद्धत

कांदा खत व्यवस्थापन

Leave a comment