शेती व शेततळ्यातील उपद्रवी उंदीरांचे नियंञण

0

सध्या शेतामध्ये, शेततलावामध्ये उंदीरांचा फार उपद्रव असल्याचे आढळून येत आहे… उंदीरामुळे शेतातील पिकांचे व आच्छादन कुरडतल्याने शेततळ्याचे फार नुकसान होत असते… उंदीर हा अतिशय चपळ, चाणाक्ष व ऊपद्रवी प्राणी आहे.

सर्वप्रथम शेतातील सर्व बिळांची पाहणी करावी. बिळांच्या तोंडाला थोडेसे गवत ठेवावे किंवा बिळांची तोंडे चिखलाने-मातीने बंद करून घ्यावित.

दुसऱ्या दिवशी यापैकी ज्या बिळांच्या समोरिल गवत विस्कळीत दिसेल किंवा जी बिळे उघडी दिसतील त्यात उंदरांचे अस्तित्व आहे असे समजावे…

उंदरांना आकर्षित करण्याकरिता गव्हाचे कणिक किंवा इतर कोणत्याही धान्याचा जाडाभरडा व त्यात थोडेसे गोडेतेल मिसळून विष न मिसळता थोडे थोडे मिश्रण आमिष म्हणून १-२ दिवस बिळासमोर ठेवावे किंवा बिळामध्ये टाकावे… चटक लागल्यासाठी हे करावे…

तिसऱ्या दिवशी सायंकाळी बिळांसमोर किंवा बिळांमध्ये झिंक फॉस्फराइड पॉईझन बाईटचा वापर करावा…

एक किलो झिंक फॉस्फराइड पॉईझन बाईट तयार करण्यासाठी १ किलो गव्हाचे कणिक किंवा इतर कोणत्याही कोणत्याही धान्याच्या जाडाभरडा घेवून त्यात २० ते २५ ग्राम झिंक फॉस्फाइड चांगल्या प्रकारे मिसळून बाईटस् तयार करुन घ्याव्यात..

बाजारात मिळणारया मैदा, गव्हाचे पीठ वापरून बनविलेल्या गोड बिस्किटांचाही वापर यासाठी केला जावू शकतो… झिंक फॉस्फाइड हे विषारी रसायनही बाजारात सहज उपलब्ध होते…

प्रत्येक बिळासाठी साधारणपणे १-२ बाईटस् वापरुन पालापाचोळा किंवा गवत टाकून ते झाकून घ्यावेत…

दुसऱ्या दिवशी शेतात मेलेले जे उंदीर सापडतील ते गोळा करून खड्ड्यात पुरून टाकावेत…

बाईटसचा पुन्हा लगेच वापर न करता १५ ते २० दिवसांच्या कालावधीनंतर परत वापर करावा…अशा प्रकारे संपूर्ण उंदरांचे पूर्ण नियंञण होईपर्यंत ही उपाययोजना करावी…

झिंक फॉस्फाइड हे उंदरांप्रमाणेच इतर प्राण्यांसाठी घातक असल्याने त्याचा वापर काळजीपूर्वक करावा… तसेच हे विषारी बाईटस् बनविताना हातात हातमोजे घालावेत, आवश्य इतर सर्व काळजी घ्यावी…

शेततळ्या भोवती गिरिपुष्प या वनस्पतींची लागवड केल्यासही उंदीर दूर राहतात..

शरद केशवराव बोंडे
जैविक शेतकरी
९४०४०७५६२८

महत्वाच्या बातम्या : –

एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही – राजू शेट्टी

पोलिसांकडे दुसरा पर्याय नव्हता, शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईचे गृहमंत्रालयाकडून समर्थन

आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी – कंगना रनौत

कृषि क्षेत्रातील ‘या’ व्यक्तींना पद्म पुरस्कार

केसर आंबा लागवड पद्धत

Leave a comment