महाराष्ट्राला दिलासा; कोरोनाच्या वाढीचा वेग मंदावला

0

कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनावाढीचा वेग आणि त्यासोबतच मृत्युदर देखील गेल्या काही दिवसांपासून कमी झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

महाराष्ट्राने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन केले असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्णसंख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत. सक्रिय रुग्णांबाबत महाराष्ट्रात दर १० लक्ष लोकसंख्येत २९० रुग्ण असताना केरळमध्ये २००० पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. एकूण मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात जास्त असली, तरी दर १० लाख लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे.

राज्यात गेल्या २४ तासात १,६२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर आतापर्यंत एकूण १९,५५,५४८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६७% वर जाऊन पोहोचले आहे
राज्यात दिवसागणिक उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसतेय; सध्या ३५ हजार ९४८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रविवारी २,६७३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

महत्वाच्या बातम्या : –

शेतकऱ्यांसाठी महत्वाचा “स्वामीनाथन आयोग” नेमका काय आहे? समजून घ्या !

मिरचीच्या विविध जातींबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

उन्हाळी मुगाच्या अधिक उत्पादनाकरिता काही प्रमुख सूत्रे

झाडांवर बुरशीचा प्रादुर्भाव कसा होतो जाणून घ्या

पंतप्रधान शेतकऱ्यांना दाबण्याचे काम करत आहेत – जयंत पाटील

Leave a comment