शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गोंधळ
शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता राज्यसभेत देखील उमटले आहेत. बुधवारी म्हणजेच ३ फेब्रुवारी २०२१ रोजी राज्यसभेत शेतकरी मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे, सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर आम आदमी पार्टीच्या ३ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे,
या तिन्ही खासदारांना सभागृहाच्या कामकाजातून एक दिवसासाठी निलंबित करण्याचे आदेश सभापतींनी दिले आहे.आपच्या खासदारांना मार्शलच्या मदतीने सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले. तत्पूर्वी ३ कृषी विधेयकांना मागे घेण्यासाठी आणि शेतकरी मुद्द्यावरून राज्यसभेचे कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.
तत्पूर्वी, कॉंग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सभागृहाचं कामकाज तहकूब ठेवण्याची नोटीस सादर केली. बसपा, सीपीआय, टीएमसी, द्रमुक, सीपीआय-एम यांनीही तहकूब करण्याचा प्रस्ताव दिला.
व्यंकय्या नायडू म्हणाले की, जेव्हा शेतकरी विषयावर चर्चा करण्याची वेळ आली आहे, तेव्हा ही घोषणाबाजी का केली जात आहे.? ही हुकूमशाही चालणार नाही असं नायडू यांनी बजावलं, आम आदमी पक्षाच्या वतीने संजय सिंह, एनडी गुप्ता आणि सुशील गुप्ता राज्यसभेत खासदार आहेत.
महत्वाच्या बातम्या : –
बॅरिकेट्समुळे शेतकऱ्यांना मोबाइल टॉयलेट्सपर्यंतही पोहोचणं कठीण
शेतीमधील जैविक खतांचे महत्व व प्रभावी वापर
शेती व शेततळ्यातील उपद्रवी उंदीरांचे नियंञण
एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही – राजू शेट्टी