उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट कायम
गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली आहे. यामुळे खानदेशातील थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडी असून कोकण, मराठवाडा व विदर्भात थंडी कमी झाली आहे. जळगाव येथे नीचांकी ११.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.
तसेच बंगाल उपसागराच्या नैर्ऋत्य भागात आणि हिंदी महासागराच्या परिसरात चक्रीय वाऱ्यासाठी समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे.
मध्य महाराष्ट्र ११ ते २०, मराठवाड्यात १४ ते १८ आणि विदर्भात १६ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते.पंजाब, हरियाना, चंडीगड आणि पश्चिम राजस्थान या भागांत थंडी कायम आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. निफाड, नाशिक, नगर भागांतही चांगलीच थंडी होती. कोकणात किमान तापमानाचा पारा १९ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.
महत्वाच्या बातम्या : –
महाराष्ट्रात गाळपासाठी अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस उपलब्ध
कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध
शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी काही उपाय
जोपर्यंत आमच्या बाजूने निकाल लागणार नाही पर्यंत लस घेणार नाहीत