महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी कायम
उत्तर भारतातील वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम थंडीवर होत आहे. त्यामुळे राज्यात अजूनही थंडी कायम आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत थंडीत काही अंशी चढ-उतार होतील अशी माहित देण्यात आली आहे. गेल्या २४ तासतात निफाड येथे नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
मराठवाड्यात थंडीत चढ-उतार असल्याने काही ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे. परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात सर्वांत कमी ११.३ अंश सेल्सिअस, तर बीडमध्ये १७.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.विदर्भातही थंडी कायम आहे. त्यामुळे अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा, चंद्रपूर भागांत ११ ते १२ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान आहे.मध्य महाराष्ट्रातील काही भागात अजूनही थंडी आहे. किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यत खाली आला आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर भागांतही किंचित थंडी आहे. यामुळे या भागात १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या परिसरात चक्रीय स्थिती असल्याने पावसासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, हरियाना, चंडीगड, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात अवकाळी पाऊस पडत आहे.
तसेच उत्तर केरळची किनारपट्टी ते दक्षिण गुजरात या दरम्यान कमी दाबाचा पट्टा अजूनही कायम आहे. यामुळे कोकणातील मुंबई, ठाणे, डहाणू भागांतील थंडी कमी होऊन किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या : –
महाराष्ट्राला दिलासा; कोरोनाच्या वाढीचा वेग मंदावला
शेतकऱ्यांसाठी महत्वाचा “स्वामीनाथन आयोग” नेमका काय आहे? समजून घ्या !
मिरचीच्या विविध जातींबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या
उन्हाळी मुगाच्या अधिक उत्पादनाकरिता काही प्रमुख सूत्रे
झाडांवर बुरशीचा प्रादुर्भाव कसा होतो जाणून घ्या