विदर्भाच्या अनेक भागात थंडी

0

विदर्भाच्या अनेक भागांत चांगलीच थंडी वाढली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या भागांतील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविण्यात आला आहे. पुढील काही दिवस विदर्भासह राज्यातील काही भागांत थंडी कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.

विदर्भातील काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे. गोंदिया, नागपूर, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर भागांत कडाक्याची थंडी जाणवत आहे.

गेल्या २४ तासात गोंदिया येथे नीचांकी ६.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याची माहित देण्यात आली आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून उत्तर भारतातील जवळपास सर्वंच भागात थंडी आहे. मात्र हिमालयाच्या परिसरात व पश्‍चिम बंगाल आणि सिक्कीम परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे पुढील दोन दिवसांनंतर या भागातील थंडी काहीशी कमी होणार असल्याचे बोलले जात आहे.

मध्य महाराष्ट्रातही थंडी असल्याने किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.मराठवाड्यातही थंडी असल्याने किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.  नगर, नाशिक, जळगाव, मालेगाव भागांत बऱ्यापैकी थंडी आहे. तर सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली भागांत काहीशी कमी थंडी आहे. कोकणातही थंडी असल्याने किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.

मुंबई (सांताक्रूझ) १९.५ (२), अलिबाग १८.९ (१), रत्नागिरी २०.५ (३), डहाणू १८.३ (१), पुणे १५ (४), जळगाव १४.२ (२), कोल्हापूर १८.७ (३), महाबळेश्‍वर १५.४ (२), मालेगाव १६.२ (५), नाशिक १४.८ (५), सांगली १८.१ (४) सातारा १५.९ (३), सोलापूर १७.६ (१), औरंगाबाद १६.३ (४), बीड १८.४ (५), परभणी १६.४ (२),नांदेड १७.१ (३), उस्मानाबाद १७.२ (३), अकोला १५.१ (१), अमरावती १३.८(-१), बुलडाणा १६.८ (२), चंद्रपूर १३.४ (-१), गोंदिया ६.८ (-६), नागपूर १०.४ (-३), वर्धा १२.६ (-१)

Leave a comment