राज्यात ‘या’ तारखेला पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता

0

आगामी काही दिवसांत राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी बांधवांच्या चिंतेत भर पडली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने याआधी पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यावेळी पाऊस झाला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या छायेखाली असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात 5 ते 11 फेब्रुवारी दरम्यान, कोकणात पावसाळी वातावरण असेल. 5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण असेल. या पावसाळी वातावरणामुळे शेतीला धोका पोहोचण्याची अधिक शक्यता आहे.

कोकणात सध्या आंबा आणि काजू पिकासाठी वातावरण आहे. मात्र, पाऊस पडला तर या पिकाला मोठा धोका निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. आंबा, भाजीपाला आणि इतर पिकांवर तुडतुडा आणि भुरी रोगाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडील पट्ट्यात आणि दक्षिण टोकाला काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या : –

२४ तासांत नागपूरच्या तापमानात ५ अंशाची घसरण

लिंबू लागवडी विषयी माहिती

26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली होणारच – कॅप्टन अमरिंदर सिंग

महाराष्ट्रातील विविध भागात मेथी २५० ते ३००० रुपये शेकडा

जमिनीवर बसून जेवणा केल्याने होतात अनेक मोठे फायदे

 

Leave a comment