थंडीमध्ये पिकांची घ्यावयाची काळजी

0

शे सध्या सर्वच विभागांमध्ये थंडीचा कहर पहायला मिळत आहे. सरासरी ५℃ ते १५℃ तापमानाची नोंद दिसून येते. अशा कमी तापमानाचा पिकांवरती अनिष्ट परिणाम पहायला मिळतो. थंडीचे पिकांवरती होणारे दुष्परिणाम व करावयाचे उपाय यांवर आपण थोडी माहिती घेणार आहोत.

दुष्परिणाम :-

१. अति थंडीमुळे पानांचा आकार कमी होणे, पानांचा रंग निळसर होणे, झाड कोमजल्यासारखे दिसणे.

२. झाडांची श्वासोच्छ्वास ( Respiration ) क्रिया मंदावणे.

३. प्रकाशसंस्लेषण ( photosynsthesis ) क्रिया मंदावणे.

४. पेशी गोठणे व त्यामुळे एकंदरीत झाडाच्या सर्वच भौतिक क्रियेत बदल होणे.

उपाय :-

१. दिवसात अथवा रात्रीत ज्या वेळेला सर्वात कमी तापमानाची नोंद असेल त्या वेळेला प्लॉट ला पाणी देणे ( जमिनीचे तापमान नियंत्रित होते ), फ्लड पाणी दिल्यास उत्तम.

२. झाडावर पाण्याचा फवारा घेणे ( स्प्रिंकलर देणे – जेणेकरून पानांवरती पाणी मारल्यावर प्लॉट मधील आद्रतेमुळे वातावरणातील तापमानापेक्षा किमान २° से. ने प्लॉट मधील तापमान वाढते. )

३. अमिनो ऍसिड युक्त औषधांचे बोरॉन मध्ये मिसळून फवारे घेणे.

४. ड्रीप मधून नत्र युक्त खते देणे ( चयापचय क्रिया वाढण्यास मदत होते ).

५.प्लॉट ची स्टेज पाहून केल्शिअम नायट्रेट चा ड्रीप मधून डोस देणे ( पेशीविभाजन होण्यास मदत )

६. सल्फरचा वापर स्प्रे मध्ये व ड्रीपने करणे ( मुळी गरम राहून क्रियाशील होते ).

७. शक्य असल्यास बागेत ठिकठिकाणी शेकोट्या करणे.

महत्वाच्या बातम्या : –

दिल्लीतील हिंसाचारानंतर मायावतींनी केंद्र सरकारला केले ‘हे’ आवाहन

‘काँग्रेसने शेतकऱ्यांना हिंसेसाठी भडकवले’, केंद्रीय मंत्र्याचा गंभीर आरोप

अमित शहांचा राजीनामा घ्या, काँग्रेसची मागणी

दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

दिल्ली हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 15 एफआयआरची नोंद

Leave a comment