आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे काळी माती

0

काळी माती, लाल माती, पिवळी माती, गाळाची माती, जांभी माती असे मातीचे अनेक प्रकार आहेत. या माती वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येतात आणि त्यांचे सर्वांचे गुण वेगवेगळे आहेत. काळ्या मातीचा विचार केला तर ती सगळ्यात जास्त उपजाऊ असते. काळ्या मातीला रेगुर माती, चिकण माती, कापसाची माती अथवा लावा माती पण म्हटलं जातं.

काळ्या मातीचा रंग काळा असतो याचं मुख्य कारण म्हणजे त्यात लोहाचं प्रमाण अधिक असतं. याशिवाय काळ्या मातीत टिटेनिफेरस मॅग्नेटाइड हे द्रव्यपण असतं. शरीरात रक्त निर्माण करण्यात लोह मुख्य भूमिका निभावतं.आयुर्वेदामध्ये अनेक आजारांवर मातीचा लेप लावून उपचार केले जातात.

आपलं शरीर पंचतत्वांनी बनलं आहे, असं मानलं जातं. त्यापैकी एक तत्व म्हणजे माती आहे. मातीमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे धान्याच्या रूपांनी आपल्या शरीरात जातात आणि आपले शरीर निर्माण करण्यात सहाय्य करतात. काळ्या मातीनं शरीरातील अनेक व्याधी दूर केल्या जाऊ शकतात. काळी माती शरीरातील घाण शोषून घेते आणि शरीराला थंड ठेवण्याचं काम करते.

डोळ्यात जर जळजळ होत असेल तर ती दूर करण्यासाठी काळी माती लाभदायक आहे. जर खूप ताप असेल तर रुग्णाच्या पोटावर ओली पट्टी बांधावी आणि तिला वारंवार बदलत राहावं. पण जर रुग्ण थंडीनं थरथरत असेल तर मात्र काळ्या मातीच्या पट्टीचा उपयोग अजिबात करायला नको. काळ्या मातीचा उपयोग पोटाचे आजार बरे केला जाऊ शकतो. मासिक पाळीत होणाऱ्या वेदना देखील यानं कमी होतात.

महत्वाच्या बातम्या : –

मातीचे आरोग्य सांभाळा, माती जिवंत ठेवा माती धूळ नाही, जिवंत परिसंस्था

द्राक्षातील खरड छाटणी नंतर सुप्त घड निर्मिती व सुप्त घड पोषणाची पंचसूत्री

विशेष मोहीम राबवून 15 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना केसीसी कर्ज दिले जाईल

शेतात औषध फवारणीचे नियम काय ? एकदा नक्की वाचा तुम्हला देखील होणार यांचा फायदा

नियमित आंबा मोहरासाठी पॅक्‍लोब्युट्रॉझॉल

 

Leave a comment