भेंडी लागवड पद्धत 

0

भेंडी रोजच्या आहारातील लोकप्रिय फळभाजी आहे. या फळभाजीची बारमाही लागवड केली जाते. बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाने भेंडीची लागवड केल्यास सरासरी उत्पादनात वाढ होते.

भेंडी पिकाच्या संकरित जाती

भेंडी पिकाच्या लागवडीसाठी खालील पैकी एका जातीची निवड करावी. एकूण १ क्षेत्रासाठी २ ते २.५ कि. ग्रॅम या प्रमाणात बियाणांचा वापर करावा.
१) राधिका २) सलोनी ३) एस डब्ल्यू ००१ ४) सिंघम ५) चिरंजीवी ६) सुकन्या ७) हरित ८) जान्हवी ९) बिंदू २१६ १०) झील्मील ११) शिवांश १२) अंकिता १३) एस डब्ल्यू ००३ १४) मायना २४, १५) रोहिणी १६) करिष्मा, १७) महिको २८, १८) जे के ७३०५ १९) सिजेंटा ओएच १०२

लागवडपूर्व तयारी
भेंडी पिकाची लागवड करण्यापूर्वी ६ मेट्रीक टन वाळलेल्या व कुजलेलया शेणखताचा वापर करावा.

नांगरटीपूर्वी ३ वर्षातून एकदा सबसॉयलरचा वापर करावा. सबसॉयलर उभे व आडवे ५ फुट या प्रमाणात असावे

प्रत्येक ३ वर्षांनंतर माती व पाणी परीक्षण करून घ्यावे.

सरीची दिशा शक्यतो उत्तर दक्षिण ठेवावी

लागवड करण्यापूर्वी बीव्हीजी कार्बन प्लस २ लिटर प्रती २५० लिटर पाणी या प्रमाणात जमिनीवर फवारून घ्यावे

बीव्हीजी जैविका प्रोमखत २५० ते ३०० कि. ग्रॅ., पोटॅश ७५ कि. ग्रॅ, सिलिका ५० कि. ग्रॅ, निंबोळी पावडर १५० कि. ग्रॅ, आयसीएल पॉलिसल्फेट ५० कि. ग्रॅ. सूक्ष्म अन्नद्रव्ये १५ कि. ग्रॅ., मायकोरायझा (बेनटोनेटे कोटेड) ४ कि. ग्रॅ. व रिजेंट किंवा फ़र्टेरा ५ कि. ग्रॅ या प्रमाणात बेसल डोस द्यावा.

लागवडीनंतर

भेंडी लागवड केलेल्या क्षेत्राच्या चारही बाजूने मका पिकाच्या ४ ओळीची लागवड करावी. त्यामुळे पिकाचे उष्णवाऱ्यापासून संरक्षण होते.

भेंडी पिकात ज्वारी, मका, चवळी व झेंडू या सापळा (Trap crop) पिकाची लागवड करावी.

लागवड झाल्यांनतर ३० ते ३५ पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. सदर सापळे २५ ते ३० दिवसांनी बदलावेत

टीप – भेंडी पिकाच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधे व खतांच्या प्रभावी परिणामांसाठी फवारणी करण्यापुर्वी पाण्याचा सामू (पी.एच) ५.५ पर्यंत नियंत्रित करुन घ्यावा.

अशी करा फवारणी

लागवडीनंतर १५ ते १८ दिवसांनी निमकोटेड युरिया २५ कि. ग्रॅ. या प्रमाणात मातीआड करून द्यावा.

लागवडीनंतर १८ दिवसांनी ११:३६:२४ (९०० ग्रॅम) प्रती १५० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवडीनंतर २० दिवसांनी कार्बन प्लस २ लिटर प्रती २५० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवडीनंतर २२ दिवसांनी बीव्हीजी ॲग्रो मॅजिक ४०० मिली, बीव्हीजी ॲग्रो न्यूट्री २०० ग्रॅम, सिल्स्प्रे ५०० मिली व व्हिगोर २५० ग्रॅम प्रती २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवडीनंतर २३ दिवसांनी ११:३६:२४ (९०० ग्रॅम) प्रती १५० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवडीनंतर २६ दिवसांनी बायो १ लिटर व ऑरगॅनिक फ्लेक्स १ कि. ग्रॅम प्रती २०० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.

लागवडी नंतर २८ दिवसांनी ०८:१६:३९ (१४०० ग्रॅम) प्रती २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवडीनंतर ३२ दिवसांनी युरिया ५० कि. ग्रॅ, बीव्हीजी जैविका प्रोमखत १०० कि. ग्रॅ, पोटॅश ५० कि. ग्रॅ,आयसीएल पॉलिसल्फेट २५ कि. ग्रॅ. सूक्ष्म अन्नद्रव्ये २० कि. ग्रॅ, निमपावडर ५० कि. ग्रॅ व सिलिका २५ कि. ग्रॅ या प्रमाणात मातीआड करून द्यावे.

लागवडी नंतर ३३ दिवसांनी ०८:१६:३९ (१४०० ग्रॅम) प्रती २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवडी नंतर ३८ दिवसांनी १२:०५:२७ अधिक cao (१६६० ग्रॅम) प्रती २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवडीनंतर ४० दिवसांनी कार्बन प्लस २ लिटर प्रती २५० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवडी नंतर ४३ दिवसांनी ००:४९:३२ (२ कि, २०० ग्रॅम) प्रती २२० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवडीनंतर ४४ दिवसांनी बीव्हीजी ॲग्रो मॅजिक ४०० मिली, बीव्हीजी ॲग्रो न्यूट्री २०० ग्रॅम, सिल्स्प्रे ५०० मिली व व्हिगोर २५० ग्रॅम प्रती २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवडीनंतर ४५ दिवसांनी पालाश गतिशील करणारे जिवाणू १ लिटर या प्रमाणात २२५ ते २५० लिटर पाण्यात मिसळून आळवणी अथवा ड्रीपद्वारे द्यावे.

लागवडीनंतर ४७ दिवसांनी निमकोटेड युरिया २५ कि. ग्रॅ या प्रमाणात माती आड करून द्यावा.

लागवडी नंतर ४८ दिवसांनी ००:४९:३२ (२ कि, २०० ग्रॅम) प्रती २२० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवडीनंतर ४८ दिवसांनी बायो १ लिटर व ऑरगॅनिक फ्लेक्स १ कि. ग्रॅम प्रती २५० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.

लागवडी नंतर ५३ दिवसांनी १३:००:४५ (२२५० ग्रॅम) प्रती २२५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवडी नंतर ५८ दिवसांनी ००:००:५०:१३ ( (२२५० ग्रॅम) प्रती २२५ लिटर पाणी या प्रमाणात दर ६ दिवसांनी फवारणी करावी.

लागवडीनंतर ६० दिवसांनी कार्बन प्लस २ लिटर प्रती २५० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवडीनंतर ६२ दिवसांनी निमकोटेड युरिया २५ कि. ग्रॅ या प्रमाणात माती आड करून द्यावा.

लागवडीनंतर ६५ दिवसांनी पालाश गतिशील करणारे जिवाणू १ लिटर या प्रमाणात २२५ ते २५० लिटर पाण्यात मिसळून आळवणी अथवा ड्रीपद्वारे द्यावे.

लागवडीनंतर ६६ दिवसांनी बीव्हीजी ॲग्रो मॅजिक ४०० मिली, बीव्हीजी ॲग्रो न्यूट्री २०० ग्रॅम, सिल्स्प्रे ५०० मिली व व्हिगोर २५० ग्रॅम प्रती २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवडीनंतर ७० दिवसांनी बायो १ लिटर व ऑरगॅनिक फ्लेक्स १ कि. ग्रॅम प्रती २५० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.

लागवडीनंतर ७७ दिवसांनी निमकोटेड युरिया २५ कि. ग्रॅ या प्रमाणात माती आड करून द्यावा.

विशेष महत्वाचे

कीड-रोगाच्या नियंत्रणासाठी पिकाच्या गरजेनुसार फवारण्या कराव्यात.

रिमझिम पाऊस व धुके असल्यास बीव्हीजी ॲग्रो सेफ ४०० मिली व सिनर्जी ५०० ग्रॅम प्रती २५० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

भेंडी पिकाची एकरी उत्पादकता ६ ते ८ मेट्रीक टन आहे. कीड- रोगाचे नियंत्रण व पाण्याचा सुयोग्य वापर केल्यास वरील तंत्रज्ञानामुळे एकरी उत्पादन १० मेट्रिक टनांपर्यंत जाऊ शकते.

Leave a comment