कालच्या भारत बंदमुळे भाज्यांचे दर 10 टक्क्यांनी वाढले

0

मुंबई –  कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी म्हणजेच ८ डिसेंबर २०२० रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातही कडकडीत बंद पुकारण्यात आले होते. अनेक बाजार समित्या आणि व्यवसाय, वाहतूक ठप्प असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याचे आता बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत बंदचा फटका आता भाज्यांना बसला आहे. यामुळे आज अनेक मोठ्या मार्केटमध्ये भाज्यांचे भाव कडाडले आहेत. खरंतर, कालच्या बंदच्या दिवशी कणकवलीत भाजपकडून अल्प दरात कांदे विक्री करण्यात आली. यामुळे ग्राहकांची कांदे खरेदीसाठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. कालच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या अनेक बाजार समित्या बंद होत्या. यामुळे आज भाज्यांचे दर कडाडले आहेत.

कालच्या बंदमुळे भाज्यांचे दर 10 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे भाज्या विकत घेताना आता नागरिकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. सिंधुदुर्गात सध्या कांद्याचे दर 45 रुपये किलो असताना भाजपकडून 30 रुपये दराने विक्री करण्यात आली. खासदार नारायण राणेंच्या सहकार्याने ही विक्री केल्याची माहिती समोर आली होती.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये एपीएमसी मार्केट सहभागी झाले होते. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. एपीएमसी मधीलपाचही बाजारपेठा पूर्ण बंद ठेवण्यात आल्या होत्या. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून आला. यामुळे आज भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

भाज्यांचे आजचे दर

– वांगी – आधी 13, आता 30 रुपये किलो

– हिरवा वाटाणा – आधी 40, आता 60 रुपये किलो

– फरस बी – आधी 50, आता 80

– गवार – आधी 300 रुपये किलो, आता 400

– कारली – आधी 16, आता 24 रुपये किलो

– काकडी – आधी 20 रुपये किलो, आता 40 रुपये किलो

– टोमॅटो- आधी 30, आता 40 रुपये किलो

– दुधी – आधी 8 रुपये किलो, आता 20 रुपये किलो

 

 

Leave a comment