गुरांच्या चांगल्या आरोग्यासाठी हे आहेत गोठ्याचे उपयुक्त प्रकार आणि त्यांचे फायदे व तोटे

0

जर महाराष्ट्राचा भौगोलिक विचार केला तर कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात तसेच विदर्भ येथील पावसाळा उन्हाळा इत्यादी ऋतूंमध्ये बराच फरक आहे. त्यामुळे गुरांसाठी गोठा बांधताना आपल्या भागातील हवामानाचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते.

शिवाय म्हशीसाठी आरामशीर तसेच ताण रहित वातावरण गोठ्यामध्ये असणे हे अधिक दूध  उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सुयोग्य बांधणीच्या गोठ्यामध्ये पाण्याची उपलब्धता पूर्णवेळ असणे गरजेचे असते तसेच चाऱ्यासाठी उत्तम जागा, शेन व मलमूत्र यांचा योग्य निचरा होण्याची व्यवस्था तसेच म्हशीसाठी सुयोग्य जागा असणे अत्यंत गरजेचे आहे. या लेखात आपण गोठ्याचे प्रकार जे जनावरांसाठी उपयुक्त आहेत. त्याबद्दल माहिती जाणून घेऊ.

गोठ्याचे प्रकार,फायदे व तोटे

मुक्त संचार पद्धतीचा गोठा

1- गुरांना सदैव व पाणी व ठराविक वेळी चारा उपलब्ध असल्यामुळे पोषण चांगले होते.

2- शरीराची हालचाल व रक्ताभिसरण मुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.

गोठ्यामध्ये ओलसरपणा नसल्यामुळे कासदाह सारख्या आजाराचे प्रमाण कमी होते.

4- माशा तसेच गोचिडांचा त्रास कमी होतो.

5- मुक्त संचार पद्धतीमध्ये जनावरांना पुरेसा व्यायाम, भरपूर सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे ड जीवनसत्त्वाची उपलब्धता होते. तसेच खुरांची व्यवस्थित निगा राखता येते.

6- गुरांच्या पालणा करता कमी मजूर लागतात.

7- उपलब्ध साधनसामग्रीचा व्यवस्थित वापर करून कमी खर्चात गोठा बांधणे शक्य होते.

अर्धवेळ ठाणबंद व मुक्त संचार पद्धत

1- गोठा बांधण्याकरिता कमी जागा लागते. हे शहरांमध्ये किंवा शहराजवळील तसेच कमी जमीन उपलब्ध असणाऱ्या पशुपालकांन करिता ही पद्धत फायदेशीर आहे.

2- या पद्धतीत म्हशीच्या रेडकांना वेगळी जागा नसल्यामुळे वाढीवर संगोपनावर विपरीत परिणाम होतो.

3- गोठ्या मधील जागा हवेशीर नसते.

  ठाणबंद गोठा पद्धत

1- गुरांना नेहमी एका जागी बांधल्यामुळे शारीरिक हालचाली अत्यंत कमी होतात. त्यामुळे गुरांमध्ये चयापचय, दूध उत्पादन इत्यादी गोष्टींवर विपरीत परिणाम होतो.

2- गुरांचे शेण, मूत्र जागेवर असल्यावर गुरे दररोज स्वच्छ करणे गरजेचे होते.

3- गोठ्यातील ओलसरपणामुळे कासदाह व कृमिचा प्रादुर्भाव होतो.

4- गुरांना ठराविक वेळी चारा, पाणी जागेवर उपलब्ध करून द्यावे लागते.

5- गोठ्याच्या छपराचा प्रकार व बसण्याची जागा यांचा विविध मोसम जसे की पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा मध्ये काही फायदे तसेच तोटेही असतात.

Leave a comment