जिवाणू खतांचे फायदे
१ ) जीवाणू खते वापरल्यास पीक उत्पादनात २० ते ४० टक्केपर्यंत वाढ आडळून आली आहे .
२ ) यांच्या वापराने जमिनीची सुपिकता व उत्पादकता वाढते .
३ ) जीवाणू अत्यंत कमी प्रमाणात लागतात . त्यामुळे त्यांच्या वापराचा खर्च अत्यल्प आहे .
४ ) जीवाणू खतांचा जमिनीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही .
५ ) नंतरच्या पिकास त्याचा फायदा होतो .
६ ) वापरण्यास अत्यंत सोपे व कमी खर्चाचे
७ ) रासायनिक खतांची बचत होते .
जीवाणू संवर्धन व बुरशीनाशके वापरण्याची पध्दत:-
१ ) हरभरा /करडई /सुर्यफुल या पिकांना जिवाणू संवर्धन २५ग्रॅ . प्रति किलो बियाण्यास वापरावे .
२ ) एक लिटर गरम पाण्यात डिंकाचे अथवा गुळाचे द्रावण तयार करावे .
३ ) वरील द्रावण थंड झाल्यावर त्यात एक पाकीट ( २०० / २५० ग्रामचे ) जीवाणू संवर्धन मिसळावे .
४)बियाण्यास स्वच्छ फरशीवर , प्लास्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ धरस्त पसरवून त्यावर तयार केलेले संवर्धनाचे मिश्रण शिंपडावे .
५ )नंतर हलक्या हाताने बियाण्यास चोळावे .
६ ) बियाण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया प्रथम करून नंतर नत्र उपलब्ध करून देणारे ( अझोटोबँक्टर किंवा रायझोबीयम ) + स्फुरद विरघळविणारे ( पी . एम . बी . २०ग्राम प्रति किलो ) यांचे मिश्रण करून बियाण्याय लावावे .
७ ) प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे .
८ ) प्रक्रिया केल्यानंतर बियाणे लवकरात लवकर पेरावे ,
९ ) रासायनिक खतांबरोबरच जीवाणु संवर्धन अथवा बुरशी नाशके मिसळवू नयेत .
१० ) ट्रायकोडमा सोबत रायझोबीयम ,अॅझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे ( पी , एस. बी .) जीवाणू या जैविक खतांची बीज प्रक्रिया करता येते .
जीवाणू संवर्धन लावतांना घ्यावयाची काळजी :-
१ ) जीवाणु संवर्धनाचे पाकीट थंड व कोरड्या जागी , किटकनाशके , बुरशीनाशके व जंतुनाशके तसेच रासायनिक खतांपासून दर टेवावे .
२ ) जीवाणू संवर्धनाच्या पाकिटावर जी अंतिम तारीख दिलेली असेल त्या तारखेपर्यंतच जीवाणू खताचा वापर करावा .
३ ) रायझोबियम / अँझोबँक्टोरम जीवाणू लावण्यापूर्वी सर्व कडधान्यांना बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया प्रथम करावी ( उदा . थायरम तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रथम लावावे व नंतर जीवाणू संवर्धन लावून पेरणी करावी)
४ ) जीवाण संवर्धन लावण्यापूर्वी जर बियाण्यास किटकनाशके , बुरशीनाशके , जंतुनाशके इत्यादी लावलेली असतील तर जीवाणू संवर्धन नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात ( १०० ग्रॅम लावणे चांगले राहिल . ) .
५ ) कोणत्याही रासायनिक खतावरोवर जीवाणु संवर्धन मिसळू नये .
६ ) प्रत्येक पिकाचे जीवाणू संवर्धन वेगवेगळे असते . ज्या पिकाचे जीवाण संवर्धन असेल ते त्याच पिकास वापरावे .
७ ) बीज प्रक्रिया सावलीत करून व पेरणीपूर्वी असे बियाणे सावलीत वाळवून नंतर ताबडतोब पेरणी करावी .अशा प्रकारे शेतकरी बंधुना वरील प्रमाणे पेरणी पूर्वी बिज प्रक्रिया केल्यास रोगाला प्रतिबंधक करून व खर्च कमी करून उत्पादनात २० ते ४० टक्के पर्यत वाढ होवू शकते .
जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८