बॅरिकेट्समुळे शेतकऱ्यांना मोबाइल टॉयलेट्सपर्यंतही पोहोचणं कठीण

0

शेतकरी आंदोलकांची नाचक्की करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आता सिंघू सीमेवर दिल्ली पोलिसांनी चार ते पाच फुटांची भिंत उभारण्यात आली आहे. या भिंतीच्या पलिकडे पाच पदरी बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत. हे बॅकिरेट्स जवळपास १.५ किमी इतके दूरवर पसरले आहेत. या बॅरिकेट्समुळे शेतकरी आंदोलकांना दिल्ली जल बोर्डाच्या पाण्याच्या टँकर्सपर्यंत पोहोचता येत नाहीय. इतकंच नाही तर शेतकऱ्यांना मोबाइल टॉयलेट्सपर्यंतही पोहोचणं आता कठीण झालं आहे.

दिल्ली पोलिसांच्या या वागणुकीमुळे शेतकरी आंदोलकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. तरीही आंदोलन थांबणार या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. “आम्ही शेतकरी आहोत. गरज पडली तर बोअरवेल खणून पाणी मिळवू पण आम्ही घाबरुन जाऊ असा सरकारने अजिबात विचार करू नये. जोवर आमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित होत नाही तोवर आम्ही इथून माघारी जाणार नाही”, असं शेतकरी आंदोलक म्हणाले.

शेतकरी आंदोलकांना आता स्वच्छतेच्या मुद्द्याशी झगडावं दैनंदिन लागतं आहे. बोटावर मोजण्या इतके मोबाइल टॉयलेट आता उपलब्ध असल्यानं शेतकरी आंदोलकांच्या टॉयलेटबाहेर रांगा लागत आहेत. यामुळे महिला आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखणं हा पोलिसांचा उद्देश नसून दिल्लीकडून मिळणाऱ्या सर्व सुविधांपासून वंचित ठेवण्याचा मनसुबा पोलिसांचा असल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे कार्यकर्ते मनजित ढिल्लन यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या : –

शेतीमधील जैविक खतांचे महत्व व प्रभावी वापर

उन्हाळी चवळी लागवड पद्धत

शेती व शेततळ्यातील उपद्रवी उंदीरांचे नियंञण

एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही – राजू शेट्टी

पोलिसांकडे दुसरा पर्याय नव्हता, शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईचे गृहमंत्रालयाकडून समर्थन

 

Leave a comment