दिल्लीत जागा मिळाल्यास शेवटचं आंदोलन करणार – अण्णा हजारे

0

दिल्लीमधील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास अण्णांनी पूर्वीच पाठिंबा दिला आहे. आता, दिल्लीतील शेतकरी आंदोलकांच्या मुलांनी अण्णा हजारेंची भेट घेतली. त्यानंतर, दिल्लीत शेवटचं आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी म्हटलंय. मात्र, त्यासाठी, जागा मिळायला हवी, असेही अण्णा म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत रामलीला किंवा जंतरमंतर येथे जागा मिळाल्यास आपण शेवटचे आंदोलन करणार आहोत, असे आश्वासन अण्णांन दिलंय. अण्णांच्या मूळगावी राळेगणसिद्धी येथे जाऊन आंदोलक शेतकरी पुत्रांनी अण्णांची भेट घेतली. त्यावेळी, दिल्लीत जागा मिळाली, तर शेवटचे आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी म्हटलं. तसेच, मोदी सरकारने लेखी दिलेलं आश्वासन पाळलं नाही, असेही अण्णांनी सांगितले. दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच आज 25 वा दिवस असून 27 डिसेंबर रोजी मन की बात कार्यक्रमाच्या दिवशीच थाळीनाद आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिलाय.

स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जादा भाव द्यायला पाहिजे. ही मागणी मोदी सरकारने गेल्या वेळेस मान्य केली. २३ मार्च २०१८ ला लिखित आश्वासन दिले, पण त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. मी सतत पत्रव्यवहार करत राहिलो; पण आश्वासन पाळण्यात आले नाही. त्यानंतर मी ७ दिवस उपोषण केले. कृषिमंत्र्यांनी तेव्हाही लिखित आश्वासन दिले की, कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याविषयी समिती बनवण्यात येईल. ३० ऑक्टोबर २०१९ ला समितीचा अहवाल येईल. त्यानंतर कार्यवाही करू. पंतप्रधान आणि दोन कृषिमंत्र्यांनी लिखित आश्वासन दिल्यानंतरही स्वामीनाथन्‌ आयोगानुसार शेतमालाला भाव आणि कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळाली नाही, असेही अण्णांनी यापूर्वीच म्हटले होते.

Leave a comment