दिल्लीतील हिंसाचारानंतर मायावतींनी केंद्र सरकारला केले ‘हे’ आवाहन

0

कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हिंसक वळण मिळाल्याचे पाहायला मिळाली. शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. यात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. यावर आता विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे, तसेच कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

बीएसपीच्या अध्यक्षा मायावती यांनी देखील केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

मायावती यांनी ट्विट केले की, देशाची राजधानी दिल्लीमध्ये काल प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान जे काही घडलं, ते कधीच व्हायला नको होतं. हे अतिशय दुर्देवी आहे तसेच केंद्र सरकारने देखील याला अतिशय गांर्भियाने घेतलं पाहिजे.

मायावतींनी मोदी सरकारला आवाहन केले की, बीएसपीची केंद्र सरकारकडे पुन्हा मागणी आहे की, त्या तीन कृषी कायद्यांना तत्काळ परत घेऊन, शेतकऱ्यांचे अनेक दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन संपुष्टात आणावे. जेणेकरून, अशी घटना कोठेच घडणार नाही.

महत्वाच्या बातम्या : –

‘काँग्रेसने शेतकऱ्यांना हिंसेसाठी भडकवले’, केंद्रीय मंत्र्याचा गंभीर आरोप

अमित शहांचा राजीनामा घ्या, काँग्रेसची मागणी

दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

दिल्ली हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 15 एफआयआरची नोंद

1 कोटी शेतकऱ्यांना सरकार देणार मोफत किसान क्रेडिट कार्ड

Leave a comment