राज्यातील तापमानात मोठी वाढ; दोन दिवस हीच परिस्थिती राहण्याची शक्यता

0

सध्या दक्षिणेकडून उष्ण वारे उत्तरेकडे वाहत असल्याने पुण्यासह राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून अजून किमान दोन दिवस हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. राज्यात सोमवारी म्हणजेच १८ जानेवारी २०२१ रोजी सर्वात कमी किमान तापमान गोंदियामध्ये १०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

पुण्यात  कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून ते २.९ अंशाने अधिक आहे. किमान तापमान १८.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली ते सरासरीच्या तुलनेत ७.१ अंशाने अधिक आहे. पुढील दोन दिवसात त्यात घट होण्याची शक्यता असून २१ जानेवारी २०२१ रोजी ते सरासरीइतके राहण्याची शक्यता आहे

हवामानातील या बदलामुळे या हंगामात राज्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता धुसर झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. तर किमान तापमान १८ ते २० अंशावर गेल्याने गरम कपडे गुंडाळून ठेवण्याची स्थिती सध्या आली आहे.

महत्वाच्या बातम्या : –

कांदा पिकावरील फुल किडीची ओळख व नुकसानीचा प्रकार

आठवड्यातील चार दिवस होणार कोरोना लसीकरण, मुख्यमंत्र्यांची माहिती

मुस्लिम समाजाच्या ‘किसानबाग’ आंदोलनामुळे आरएसएस-भाजपच्या जातीवादी राजकारणाला शह मिळेल – प्रकाश आंबेडकर

जैविक, नैसर्गिक, सेंद्रिय, विषमुक्त, शेती करण्याचे फायदे व रासायनिक का नको….? ह्याबद्दलची 50 कारणे

जाणून घ्या कढीपत्त्याचे अनेक गुणकारी फायदे

 

Leave a comment