परभणीमध्ये गाजरांची ५०१ क्विंटल आवक
परभणी येथील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी म्हणजेच ४ डिसेंबर २०२० रोजी गाजरांची ५०१ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल २५००, तर सरासरी २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १२ क्विंटल आवक होऊन २००० ते ३०००, तर सरासरी २५०० रुपये दर मिळाले.
कारल्याची १० क्विंटल आवक होऊन १२०० ते २०००, तर सरासरी १६०० रुपये दर मिळाले. काकडीची ३० क्विंटल आवक होऊन ८०० ते १२००, सरासरी १००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची २००० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ३०० ते ५००, सरासरी ४०० रुपये मिळाले.
हिरव्या मिरचीची ६५ क्विंटल आवक होऊन १५०० ते २५००, सरासरी २००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक होऊन १२०० ते १५००, सरासरी १३५० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यामध्ये वाटाण्याची ७० क्विंटल आवक होऊन २५०० ते ४५०० रुपये, तर सरासरी ३५०० रुपये दर मिळाले. शेवग्याची ८ क्विंटल आवक झाली. दर ३००० ते ५०००, तर सरासरी ४००० रुपये मिळाले.
गवारीची १५ क्विंटल आवक होऊन २००० ते ३०००, तर सरासरी २५०० रुपये दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक झाली. दर २००० ते ३०००, तर सरासरी २५०० रुपये मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक होऊन १००० ते १५००, सरासरी १२५० रुपये दर मिळाले. मेथीच्या ४० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा १५० ते २५० तर सरासरी २०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची २०० क्विंटल आवक होऊन ५०० ते ८००, तर सरासरी ६५० रुपये दर मिळाले.
भेंडीची २० क्विंटल आवक होऊन १२०० ते २००० रुपये, तर सरासरी १६०० रुपये दर मिळाले. कोबीची ४० क्विंटल आवक होऊन १००० ते १५००, सरासरी १२५० रुपये दर मिळाले. वालाची ५ क्विंटल आवक होऊन १५०० ते २५०० तर सरासरी २००० रुपये दर मिळाले.पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक होऊन ४०० ते ७००, तर सरासरी ५५० रुपये दर मिळाले.
शेपूची ४० क्विंटल आवक होऊन ४०० ते ६००, सरासरी ५०० रुपये दर मिळाले. लिंबांची ३५ क्विंटल आवक होऊन ५०० ते १०००, सरासरी ७५० रुपये दर मिळाले. पेरुची ४० क्विंटल आवक होऊन ६०० ते १०००, सरासरी ८०० रुपये दर मिळाले. पपईची ७० क्विंटल आवक होऊन ५०० ते १०००, सरासरी ७५० रुपये दर मिळाले.