औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीची ५ क्विंटल आवक
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीची ५ क्विंटल आवक झाली. त्यांना सर्वसाधारण ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
३३ क्विंटल आवक झालेल्या , भेंडीची आवक १६ क्विंटल, तर सर्वसाधारण दर २००० रुपये राहिले. ३ क्विंटल आवक झालेल्या गवारीचे सर्वसाधारण दर ३५०० रुपये तर कोबीची ४२ क्विंटल आवक, तर दर सर्वसाधारण ४५० रुपये, लिंबांची आवक ११ क्विंटल, दर लिंबांना सर्वसाधारण २६५० रुपये दर मिळाला.
१९ क्विंटल आवक झालेल्या ऍपल बोरांचे सर्वसाधारण दर ९०० रुपये राहिले. ८ क्विंटल आवक झालेल्या संत्र्यांची सर्वसाधारण दर १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १३५ क्विंटल आवक झालेल्या कलिंगडाला सर्वसाधारण ४०० रुपये, खरबुजाची आवक २२ क्विंटल, तर सर्वसाधारण दर ११०० रुपये, द्राक्षाची आवक ६ क्विंटल, सर्वसाधारण दर ३५०० रुपये, २६५ क्विंटल आवक झालेल्या बटाट्याला सर्वसाधारण १०५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
९ क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे सर्वसाधारण दर ५०० रुपये, ढोबळ्या मिरचीची आवक ५ क्विंटल, सर्वसाधारण दर १९०० रुपये प्रतिक्विंटलचा मिळाला. शेवग्याचे सर्वसाधारण दर २७५० रुपये, ११० क्विटंल आवक झालेल्या पपईला सर्वसाधारण ४०० रुपये,
२९ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला सर्वसाधारण ६०० रुपये, टोमॅटोची आवक ९९ क्विंटल, सर्वसाधारण दर ७५० रुपये, ३७ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांचे सर्वसाधारण दर १३०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. हिरव्या मिरचीचे दर सर्वसाधारण ३२०० रूपये, कांद्याची आवक ५०४ क्विंटल, तर सर्वसाधारण दर २६०० रुपये,
महत्वाच्या बातम्या : –
आज होणारी ट्रॅक्टर मार्चवरील सुनावणी तहकूब
स्वीट कॉर्न लागवडीसाठी अनुदान कसे मिळवायचे ते जाणून घेऊया
गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची सुमारे ९० ट्रक आवक