परभणी मार्केटमध्ये वाटाण्याची ४०० क्विंटल आवक

0

पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये वाटाण्याची ४०० क्विंटल आवक झाली. त्यांना सर्वसाधारण ११५० रुपये दर मिळाले. दोडक्याची १० क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर ३००० रुपये, कारल्याची १५ क्विंटल आवक, सर्वसाधारण दर ११०० रुपये, काकडीची ७० क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर ७५० रुपये मिळाले.

गवारीची १२ क्विंटल आवक, तर सर्वसाधारण ३२५० रुपये दर मिळाले. चवळीची ६ क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर २५०० रुपये, वालाची १० क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर २५०० रुपये मिळाले.शेवग्याची ४ क्विंटल आवक होती. त्याला प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ८००० रुपये, तर सर्वसाधारण ६५०० रुपये दर मिळाले.

कोबीची ६० क्विंटल आवक, सर्वसाधारण ७५० रुपये दर, गाजराची ३०० क्विंटल आवक, सर्वसाधारण दर ११०० रुपये, लिंबांची १५ क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर २००० रुपये, पेरुची ७० क्विंटल आवक, सर्वसाधारण दर २२५० रुपये, पपईची ७० क्विंटल आवक, सर्वसाधारण दर ७५० रुपये, मक्याची २० क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर ११५० रुपये मिळाले.

दुधी भोपळ्याची २० क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर ७५० रुपये, पालकाची १५ क्विंटल आवक, सर्वसाधारण दर ७५० रुपये, शेपूची २० क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर ७५० रुपये, चुक्याला सर्वसाधारण दर २५०० रुपये मिळाले.

महत्वाच्या बातम्या : –

बर्ड फ्लूमुळे ग्राहकांनमध्ये वाढली भीती, चिकन 45 रुपयांनी स्वस्त

देशातील कापसाचे उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत कमी

लखीमपूर खीरीची खेरीगढ गाय आहे आश्चर्यकारक, त्याची वैशिष्ट्ये वाचा

जेव्हा मुख्यमंत्री आपला ताफा अचानक थांबवून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतात

शेतकऱ्यांशी बैठक ‘निष्फळ’ ठरल्यानंतर राहुल गांधी संतापले

 

Leave a comment