महाराष्ट्रच्या विविध भागात हरभरा ३१०० ते ४७५० रुपये

0

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सध्या हरभरा काढणी सुरु आहे. त्यामुळे आवक तुरळक आहे. बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात पाच क्विंटल हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. त्यास चार हजार ३११ रुपये दर मिळाला. जिल्ह्यात यंदा तब्बल दोन लाख हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. परंतु सध्या हरभरा काढणीला वेग आला आहे. पुढील आठवड्यात काढणी सुरु होइल.

हिंगोलीमध्ये हरभऱ्याची  १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ४०५० ते कमाल ४२५० रुपये, तर सरासरी ४१५० रुपये दर मिळाले.सध्या स्थानिक परिसरातून आवक कमी प्रमाणात आवक होत आहे. भुसार मालासोबत एक दिवस आड आवक घेतली जात आहे.

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक ४८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३३०० ते ४१०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० रुपये होते.

अकोला येथील कृषी उत्पन्न  बाजार समितीमध्ये हरभरा सरासरी ४२०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. सध्या आवक २५० क्‍विंटलपर्यंत होत आहे. यंदाच्या रब्बीत लागवड केलेला सुरवातीचा हरभरा काढणी सुरु झाली आहे. हळूहळू बाजारात हे पीक विक्रीला येत आहे. परतीच्या पावसामुळे पीक चांगले जमले होते. परिणामी उत्पादनही चांगले येईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हरभऱ्याची आवक जेमतेम राहिली. पण मागणी असल्याने हरभऱ्याचे दर टिकून राहिल्याचे सांगण्यात आले. हरभऱ्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये दर मिळाला. हरभऱ्याला प्रतिक्विंटलला किमान ४००० रुपये सरासरी ४२०० रुपये, सर्वाधिक ४५०० रुपये असा दर मिळाला.

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात हरभऱ्याची आवक नगन्यच झाली. आवक झालेल्या हरभऱ्याला सरासरी ३१०० ते ४७५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

जळगाव बाजार समितीत हरभऱ्याची आवक या आठवड्यातच सुरू झाली आहे. सुरवातीला दर अधिक मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु दर हमीभावापेक्षा कमी म्हणजेच किमान ४००० व कमाल ४४०० रुपये प्रतिक्विंटल, असे मिळत आहेत. आवक सध्या कमी आहे. पुढील आठवड्यात आवक वाढेल, असे संकेत आहेत.

महत्वाच्या बातम्या : –

गांडूळ अर्क वापरण्याची पद्धत व फायदे

मधमाशी पालन एक शेतीपूरक व्यवसाय, सरकार देतयं भरघोस अनुदान; ‘या’ ठिकाणी करा अर्ज

ओळखा अन्नद्रव्यांची कमतरता

अण्णांची मनधरणी करण्यास फडणवीसांना यश, उपोषणातून माघार

घेवडा लागवड पद्धत

 

 

Leave a comment