कृषी योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांचा सहभाग ३० टक्के – दादा भुसे

0

अहमदनगर – कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजना यापुढे ३० टक्के महिला शेतकरी असतील. राज्याचा कृषी विभाग तसे नियोजन करत आहे, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.  कृषी विभागातर्फे मानोरी  कृषी विभागाने केलेल्या राज्यभरातील रिसोर्स बॅंकेतील प्रगतिशील व कृषिभूषण पुरस्कारप्राप्त पाच हजार शेतकऱ्यांशी कृषिमंत्री दादा भुसे यांनी संवाद साधला.

कृषिमंत्री भुसे म्हणाले, की कृषी पर्यटनाबाबत चांगले धोरण राबवले जात आहे. त्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जातील. रेशीम, कृषी, फलोत्पादन विभाग एकत्रित रेशीमला चालना देणार आहोत.

राज्य शासनाच्या कृषी विभागाने रिसोर्स बँकेच्या माध्यमातून राज्यभरातील प्रयोगशील व पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना एकत्र करून शेती हिताचा उपक्रम राबवला जात आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र नगर व राहुरीच्या कृषी विभागाला याचे फारसे देणेघेणे नसल्याचे दिसून आले. अनेक प्रयोगशील व पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना वगळल्याचे दिसून आले. हा कार्यक्रम कृषी विभागाने जाणीवपूर्वक प्रसिद्धीपासून दूर ठेवला, अशी टीका होत आहे.

माती परीक्षणाची सात-बारावर नोंद करण्याचा विचार कृषी विभाग करत आहे. यापुढे कृषी योजनांत ३० टक्के महिला शेतकरी लाभार्थी निवडण्यात येणार आहेत. संकटकाळात शेती सुरू राहिली. शेतकरी पाठीशी उभे आहे, पण समाजानेही शेतकऱ्याला मदत करावी. ‘विकेल ते पिकेल’ याप्रमाणे कृषी विभाग काम करत आहे.

या वेळी रिसोर्स बॅंकेतील प्रगतिशील शेतकरी धनंजय जोशी , पौर्णिमा सवाई, राजेंद्र देशमुख, वैशाली पाटील ,देवेंद्र राऊत , उत्तमराव खुणे , मालन राऊत , आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने, सबाजीराव गायकवाड, विष्णुपंत जरे, सुनंदा भागवत, रखमाजी जाधव, राजेंद्र गाडेकर यांच्यासह कृषी सचिव एकनाथ डवले ऑनलाइन सहभागी झाले होते.

Leave a comment