पिंपरी चिंचवडमध्ये आढळले नव्या कोरोना स्ट्रेनचे 3 रुग्ण
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार आढळल्यानंतर महाराष्ट्रात त्वरित खबरदारीचे उपाय करण्यात आले होते. असे असले तरीही राज्यात या नव्या कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे.
या नव्या प्रकाराची लागण झालेले आणखी 3 रुग्ण राज्यात आढळले आहेत व हे तिन्ही रुग्ण पिपंरी-चिंचवडमधील आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत माहिती दिली. यामुळे आता पिंपरी-चिचंवडकरांची चिंता वाढली आहे.
राजेश टोपेंनी ट्विट करत सांगितले की, ब्रिटनमधील नवीन कोरोना स्ट्रेनचे राज्यात आणखी 3 प्रवाशी आढळले. तिनही प्रवाशी पिंपरी चिंचवडचे असून नव्या कोरोना स्ट्रेनचे राज्यात आता एकूण 11 प्रवाशी झाले आहेत.
ब्रिटनमधील नवीन कोरोना स्ट्रेनचे राज्यात आणखी 3 प्रवाशी आढळले. तिनही प्रवाशी पिंपरी चिंचवडचे असून नव्या कोरोना स्ट्रेनचे राज्यात आता एकूण 11 प्रवाशी झाले आहेत.
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 7, 2021
दरम्यान, आज केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महाराष्ट्रातील 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 3 आरोग्य संस्था आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 1 आरोग्य संस्था याठिकाणी हा ड्राय रन घेण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या : –
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर
भटक्या गायी आणि म्हशींना लागणार माइक्रोचिप; कैटल फ्री कैपिटल होणार दिल्ली
घरच्या घरी असे तयार करा अग्नी अस्त्र कीटकनाशक
चर्चेआधी शेतकऱ्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, आजच्या बैठकीत तोडगा निघणार ?
शेतकरी आंदोलन: हरियाणातील महिलांनी रॅलीचे नेतृत्व करत ट्रॅक्टरचे स्टेअरिंग घेतले हाती