दिल्ली हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 15 एफआयआरची नोंद

0

केंद्राने तयार केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर  प्रजासत्ताक दिनी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर दिल्लीला छावणीचे स्वरूप आले आहे.

संवेदनशील भागांत पोलिसांसोबतच CRPFच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. या हिंसाचारात 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर ट्रॅक्टर उलटल्याने एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत 15 FIR नोंदविण्यात आल्या आहेत.

या हिंसाचार प्रकरणी 15 FIR नोंदविण्यात आल्या असून त्यातील 5 FIR ईस्टर्न रेन्जमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत. मंगळवारी झालेल्या हिंसाचारानंतर गृह मंत्रालयाने दिल्लीच्या काही भागांत इंटरनेट सेवा बंद केली आहे.

दिल्ली पोलीस आता सीसीटीव्ही फुटेडच्या माध्यमाने समाज कंटकांचा शोध घेण्यात येत आहे. यात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर, लाल किल्ल्यावर चढणाऱ्यांवर आणि सरकारी संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असेल. यातच गँगस्टर लक्खा सिंह सिधाना चेही नाव समोर येत आहे. लक्खा सिधाना आणि त्याच्या सहकाऱ्यांचा मध्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारात हात असल्याचा आरोप आहे.

महत्वाच्या बातम्या : –

1 कोटी शेतकऱ्यांना सरकार देणार मोफत किसान क्रेडिट कार्ड

जाणून घ्या जमीन मोजणीच्या युनिट्सबद्दल महत्वाच्या गोष्टी!

चंदन लागवड पद्धत

‘माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवारसाहेबांनी दखल घेणं हे भाग्यचं’, पवारांच्या टीकेला दरेकरांचे उत्तर

‘हाच बळीराजा यांची सत्ता उलथवून लावेल’

 

Leave a comment