औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाट्याची १२९ ते ३८७ क्‍विंटल आवक

0

औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाट्याची १२९ ते ३८७ क्‍विंटल आवक झाली . बटाट्याला सर्वसाधारण १००० ते १२५० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाले. बहुतांश बटाट्याची आवक ही मध्यप्रदेशातून होते.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात  बटाट्याची आवक कमी राहिली. पण, मागणी असल्याने दर टिकून राहिल्याचे सांगण्यात आले. बटाट्याची आवक बाहेरील जिल्ह्यातूनच झाली. प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सर्वसाधारण १८०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये दर मिळाला. पंधरवड्यापूर्वीही काहीशी अशीच स्थिती राहिली. आवक तशी जेमतेमच राहिली. पण, दर प्रतिक्विंटल किमान ७०० रुपये, सर्वसाधारण १५०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये मिळाला.

जळगाव  कृषी उत्पन्न बाजार समितीत  बटाट्यांची ४५० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते २६००, असे होते. आवक जळगाव जिल्ह्यातील यावल, मध्य प्रदेश आदी भागातून होत आहे. दर कमी झाले आहेत.

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाट्याची आवक १८८२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १०५० ते २१५० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १५३० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये बटाट्याचे दर प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल २००० रुपये, तर सर्वसाधारण १७५० रुपये होते. बटाट्याची १२० क्विंटल आवक झाली. त्यावेळी घाऊक खरेदीचे दर प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये होते. गुरुवारी (ता.१४) बटाट्याची किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने सुरु होती.

सांगली येथील विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात गुरुवारी (ता. १४) बटाट्यांची ११८० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २०००, तर सर्वसाधारण १७५० रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

अकोला येथील बाजारात बटाट्याची दिवसाला ५ ते ६ गाड्यांची आवक होत आहे. १२०० ते २००० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. या बाजारपेठेत इंदोर आणि खंडवा या ठिकाणांवरून बटाट्याची सध्या आवक सुरु आहे.बाजारात इंदोरच्या बटाट्याचे दर १२०० ते १५०० दरम्यान आहेत.

 

 

Leave a comment