शेतकऱ्याची यशोगाथा ,कोथिंबीरितून मिळवले साडे बारा लाख

0

नाशिक : शेतकऱ्याला कष्टाचं फळ तेव्हाच मिळतं जेव्हा त्याच्या पिकाला चांगला भाव मिळतो. शेतात अपार कष्ट करून, घाम गाळून शेतकरी राबत असतो. अगदी आपल्या लेकरांसारखीच किंवा त्यापेक्षा काकणभर अधिक काळजी तो आपल्या पिकाची घेत असतो. पिक हातातोंडाशी आल्यावर सुरूवात होते त्याच्या अग्निपरीक्षेला… ती अग्निपरीक्षा म्हणजे माल योग्य दरात बाजारात विकणं….

शेतकऱ्याला योग्य बाजारभाव मिळाला तर त्याचा आनंद गगनात मावत नाही. असाच गगनात न मावणारा आनंद शेतकरी विनायक हेमाडे यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे

नाशिक जिल्ह्यातील सिन्नार तालुक्यातील नांदूर शिंगोटे गावच्या विनायक हेमाडे यांच्या दर्जेदार उत्पादनाला मिळालेलं उत्पन्न देखील तसंच दर्जेदार आहे. या शेतकऱ्याची पंचक्रोशी आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

शेतकऱ्याची ही यशोगाथा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं फळ मिळालं याचा आनंद व्यक्त केला जात आहे. या यशोगाथेतून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

Leave a comment