
शेतकऱ्यांच्या व्यथाही दारुण. येती डोळा भरूण…..
आमचंही जगणं कबुल करा..
देशातील शेतकरी जगला तरच देश जगेल. हे त्रिकालबाधित सत्य खरे पण बदलत्या काळात ही शेतकऱ्यांच्या जगण्याची हमी काही केल्या मिळत नाही. असे असले तरी शेतकरी मात्र आपल्या इमानाला जागत असल्याचे दिसतेय स्वतः कष्ट करायचे प्रसंगी मरण यातना भोगायच्या पण देशवासियांना सुखाचा घास भरवायचा. अशी शेतकऱ्यांची वृत्ती आहे. आम्ही लढा लढतोय तो नां राजकारणासाठी ना स्वार्थासाठी लढा लढतोय ते आमच्या अस्तित्वासाठी.सरकारचा धोरणात्मक
पाठींबा उद्योगाला आणि शेतीलाही गरजेचा आहे. शेतीमालचे उत्पादन वाढत असेल मात्र त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होत नसेल तर शेतकऱ्यांचे कल्याण कसे होणार. राज्यात सर्वाधिक कोरडवाहू क्षेत्र मराठवाडा व विदर्भात असुन त्यांचा विकास झाला पाहिजे. विदर्भ हा कापुस पट्याचा भाग आहे. म्हणुन वऱ्हाड अन सोन्याची कुऱ्हाड आज विदर्भाला म्हटल्या जातंय. शेतकऱ्यानी कापुस पिकविला नाही. तर कापडं उद्योग कसा चालेल त्यामुळे दोन्ही गोष्टी परस्परांशी निगडित असुन दोघांनाही अनुकूल असे धोरण सरकारणे राबविणे आवश्यक आहे.एकंदरीत शेती जिवंत राहिली तरच विकास आपोआपच होईल. कृषीलाही चालना मिळाली पाहिजे. हे कबुल आहे पण
दहा टक्के उद्योगाचा विचार करतांना नव्वद टक्के सामान्यांचा विचार देखील होणे आवश्यक आहे.आज राज्यात वृष्टी अतिवृष्टी वादळवारा गारा हे नैसर्गिक संकट हे कांही शेतकऱ्यांचा पिछा सोडायला तयार नाहीत. सिंचनासाठी विजेचा अभाव. शेतातील उभ्या पिकांची नासाडी करणारे हिंस्त्र पशु. शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव पिकांच सुरक्षाकवच असणारी निष्क्रिय पंतप्रधान पीकविमा योजना. शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या कृषिबाजार समित्याचा ढिसाळ कारभार.केंद्र व राज्य सरकारचा शेतकऱ्यांप्रती असलेले उदासीन धोरणामुळे शेतकरी हतबल होऊन. आज अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यांना पुन्हा ताकत देऊन उभे करणे हे सत्ताधाऱ्या समोरचे फार मोठे आव्हान आहे.शेतीचे सामर्थ्याने ओळखून स्व लालबहादूर शास्त्रीजीनी जय जवान जय किसान हा नारा दिलाय. शास्त्रीजीच्या पुढाकारातून शेती उत्पन्नवाढीच्या संशोधनाला गती मिळाली. गहू ज्वारी तांदूळ अशा पिकांच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जातीचे संशोधन देशातील शास्त्रज्ञानी व कांही परदेशाच्या साह्याने शोधून काढले. त्यावर शेतकऱ्यांनी अपार कष्ट करून. अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण केले. परंतु वाढत्या नैसर्गिक आपत्ती बाबत जगाच्या तुलनेत संशोधन व प्रक्रिया यांचा फार मोठा अभाव आहे.देशामध्ये बहुताश शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे परिस्थिती आज वाईट आहे आज स्वार्थाच्या बाजारपेठेत स्वार्थाच्या नद्या दुथड्या भरभरून वाहत आहेत. निस्वार्थीचे गावं ओस पडत आहे. निर्मोहीनपणाच्या सदनात निरव शांतता पसरली आहे. गरिबी व श्रीमंतिची दरी वाढत आहे शेतकऱ्यांच्या परिस्थितीच चित्र एक विदारक चित्र विचित्र दिसतय.
मी शरद केशवराव बोंडे. माझ्या मते सरकारने शेतकऱ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून आत्महत्यापासून परावृत्त करण्यासाठी सरकारनें शेतकरी हिताचे धोरण राबविणे व त्याच बरोबर समाज सामाजिक संस्था
शासन प्रशासन राजकीय पक्षांनी त्याला सरकारी योजनाचा लाभ देण्याचा व मानसिकदृष्ट्या प्रभोधनातून संस्कार घडविण्याचा प्रयत्न मनापासून इमानदारीने केल्यास निश्चितच शेतकरी आत्महत्यापासून परावृत्त होऊ शकेल.इंग्रजाच्या काळातही शेतकरी अडचणीत होता परंतु त्या काळात शेतकऱ्यांना व इतर सर्वांना अध्यात्मिक संस्कार दिले जात असत समाजासमाजातून आधार मिळत असे. विश्वास असे आपुलकी असे त्यामुळे तो मोठया आत्मविश्वासाने येणाऱ्या प्रसंगाचा मुकाबला करीत असे. पुन्हा कष्टातुन आपला संसार उभा करत असें..निसर्गाच्या बदलत्या ऋतुचक्रातील प्रत्येक पावलांवरच्या संघर्षाने बर्बाद होणाऱ्या शेतकऱ्याचही जगणं कबुल करा.
दुःखाची दौलत आहे.हुंदक्याच पिक आहे.
आज आमचे अश्रूही संपलेत आहे
बाकी सार ठिक आहे…
फक्त शेतीमालाला भाव
आणि खत, वीज, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यास आम्हाला कोणत्याही अनुदानाची अपेक्षा नाही… विचाराची दिशा बदला परिस्थिती बदलाला काहीच वेळ लागत नाही
धन्यवाद
🙏
लेखक – जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८