म्हणून कपाशी  उत्पादकांना येणार अच्छे दिन 

0
सध्या दसरा आणि दिवाळीमुळे खऱ्या अर्थाने बाजारात पुन्हा एकदा चैतन्य येण्यास सुरुवात झालेली आहे. अशावेळी जागतिक बाजारात कापूस या नगदी पिकाचे भाव वाढत असल्याने त्याचा परिणाम म्हणून कपड्यांचे भावही वाढण्याचा अंदाज आहे.
मागील दोन महिन्यात कपाशीच्या गाठीच्या भावात तब्बल १५ टक्के इतकी वाढ झालेली आहे. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाना आणि मध्यप्रदेश या प्रमुख कपाशी उत्पादक पट्ट्यात झालेल्या पावसामुळे बर्याच भागात यंदा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात चीन आणि अमेरिकेत सध्या ट्रेड वॉर चालू आहे. त्यामुळे चीनने कपाशीची मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवली आहे. 
परिणामी भारतात कापूस उत्पादकांना याचे चांगले भाव मिळतील. मात्र, त्याचवेळी कापडाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या कपाशीच्या गाठीचे भाव १५ टक्क्यांनी वाढून १९ हजार ८०० रुपये बेल  (१७० किलो) यावर पोहोचले आहेत. हेच भाव पुढील काही दिवसात थेट २२ हजार ५०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता एंजल ब्रोकिंग यांचे अनुज गुप्ता यांनी व्यक्त केली आहे. फायनान्सीअल एक्स्प्रेस यांनी यावर बातमी दिलेली आहे.
Leave a comment