कोथिंबीर आरोग्यासाठी आहे ‘इतकी’ लाभदायक, वाचा …
आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण असे कितीतरी पदार्थ खात असतो ज्याचे फायदे किंवा उपयोग आपल्याला माहिती नसतात. आता कोथिंबीरीचेच घ्या ना.. आपल्यापैकी कितीतरी लोकांना कोथिंबीर खाण्याचे फायदे माहिती नसतील. यासाठी आम्ही आज याबाबत माहिती देणार आहोत .
‘हे’ आहेत कोथिंबीरीचे फायदे
Related Posts
- १) कोथिंबीर ताज्या ताकात टाकून पिल्यानं अपचन, मळमळ, अतिसार आणि आतड्याला आलेली सूजपासून बचाव करता येतो.
- २) टायफाइड झाल्यास कोथिंबर खाल्यानं फायदा होतो. कोरडे धणे पाण्यात उकळून पाणी गाळून थंड करावं. ते पाणी पिल्यानं कॉलेस्ट्रालची लेव्हल कमी करता येते.
- ३) कोथिंबीरीचा एक चमचा ज्यूसमध्ये थोडी हळद टाकून मुरूमांवर लावल्यास ते बरे होतात.
- ४) कोथिंबीर, हिरवी मिर्ची, किसलेलं खोबरं आणि आलं घालून चटणी खाल्लानं अपचनामुळं होणारी पोटदुखीत आराम मिळतो.
- ५) आरोग्य तज्ज्ञांच्या मतेही थंडीच्या दिवसांमध्ये आहारात कोथिंबीरीचा वापर आरोग्यदायी ठरतो