जालना बाजार समितीमध्ये केवळ एकवेळ चिंचेची ४ क्विंटल आवक झाली. या चिंचेला ६००० ते १०००० हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. चिंचेचा सरासरी दर ८ हजार रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती देण्यात आली आहे.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यासह विदर्भ व कर्नाटकामधून चिंचेची आवक होत आहे. बुधवारी बाजार समितीमध्ये २३६ क्विंटल आवक झालेल्या चिंचेला ७००० ते १२५०० रुपये, तर सरासरी ९५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. लातूर बाजार समितीत लातूर जिल्ह्यासह विदर्भ व कर्नाटकातूनही चिंचेची आवक होते आहे.
अकोला येथील बाजारात न फोडलेली चिंच २००० ते ३००० रुपयांदरम्यान प्रतिक्विंटल विकत आहे. किरकोळ विक्री ४५ ते ६० रुपये प्रतिकिलो दराने होत आहे. उन्हाळ्यात उपलब्ध होणारी चिंच यंदा अनेक ठिकाणी चांगली बहरलेली आहे. सध्या काढणी सुरु झाल्याने बाजारात आवक होत आहे. चांगल्या प्रतिची चिंच ३ हजार रुपयांवर विकत आहे. पुढील महिन्यात चिंचेची अधिक आवक वाढणार आहे. तेव्हा दर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
नांदेड बाजारात सध्या स्थानिक चिंच येत आहे. दररोज तीन ते चार क्विंटल चिंच बाजारात येते. या चिंचेला सध्या ८ हजार ते ८५०० रुपये दर मिळत आहे. नांदेडमध्ये चिंच शेतकरी विक्रीसाठी शहरातील नवा मोंढा, जुना मोंढा, तरोडा मार्केट, इतवारा बाजार, कामठा बाजार या ठिकाणी विक्रीसाठी आणतात. सध्या या बाजारात चिंच दररोज चार ते पाच क्विंटल येत असल्याची माहिती मिळाली. या चिंचेला सध्या आठ हजार ते साडेआठ हजार रूपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
नाशिक सध्या हंगाम नसल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये चिंचेची आवक कमी आहे. जिल्ह्यात चिंचेला किमान २१०० ते कमाल २५०० असा प्रतिक्विंटल दर मिळत आहे. तर सरासरी २३८० रुपये दर मिळत आहे. चालू महिन्यात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत न फोडलेल्या चिंचेची आवक ५ क्विंटल आवक झाली. त्यास किमान २२०० ते कमाल २५०० दर राहिला. तर २३८० रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळला.
परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये चिंचेचे दर प्रतिक्विंटल ८००० ते १०००० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. गेल्या दोन आठवड्यांपासून येथील मार्केटमध्ये आठवड्यातील प्रत्येक शनिवारी स्थानिक परिसरातून १० ते १५ क्विंटल चिंचेची आवक होत आहे.
नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीत चिंचेला प्रतिक्विंटल ५ हजार ते १० हजार व सरासरी ७ हजार ५०० रुपयांचा दर मिळत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत चिंचेची आवक वाढताच बाजारात दरात मात्र घसरण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या : –
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक भागातील शेतीचे नुकसान
शेतकऱ्यांना दिलासा, ‘या’ योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार
पावसामुळे सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्षबागांचे नुकसान
राज्यात रुग्णवाढीने चिंता, गेल्या २४ तासात ५,४२७ रुग्णांची वाढ
मायकोरायझा म्हणजे नक्की काय जाणून घ्या…