जाणून घ्या उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे लाभदायक फायदे

0

उन्हाळ्यात आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे शरीराला थंडावा मिळावा यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात खरबूज हे फळ सर्वोत्तम आहे. यामध्ये पोषण तत्वे भरपूर प्रमाणात आहेत. मे महिना सुरु होताच उन्हाचा चटका मोठ्या प्रेमात जाणवू लागला आहे . वाढत असलेल्या या उन्हामुळे  त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवू शकतो. खरबुजामुळे उष्णतेपासून आपले बचाव होते आणि आजारांपासून आपल्या संरक्षणही मिळते. कारण, खरबुजमध्ये ९५ टक्के पाण्‍यासोबत व्हिटामिन्‍सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे शरीराशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खरबूज खाणे आपल्या आरोग्यास खूप लाभदायक आहे.

चला तर जाणून घेऊया काय फायदे खरबूज खाण्याचे फायदे…

– अंगाला खाज सुटत असेल तर खरबुजाचे सेवन करणे लाभदायक ठरते.

– खरबुज या फळत मोठ्या प्रमाणात अ‍ॅंटी ऑक्‍सीडेंट, व्हिटामिन्‍स `सी` आणि `ए` मोठ्या प्रमाणात आहे.

– खरबूज मोठ्या प्रमाणात आहारात घेतल्‍यानंतर त्‍वचा उजळते.

– खरबुजामध्‍ये आर्गेनिक पिगमेंट कॅरोटीनाइड प्रमाण मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे कॅन्‍सरसारख्‍या रोगापासून बचाव करता येतो.

– खरबूजामध्‍ये अ‍ॅडेनोसीन असल्‍यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होतं.

– खरबूजचे सेवन केल्यास आरोग्‍य निरोगी आणि सुरक्षीत राहते.

– कफ झाला असेल, पचन होत नसेल, तर खरबूज शरीरासाठी अत्यंत लाभदायक ठरते.

– खरबूजामध्‍ये व्हिटामीन बी असल्‍यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा वाढवण्‍यासाठी मदत होते.

–  खरबूज साखर आणि कार्बोहाइड्रेट संतुलीत करण्‍याचे काम करतात.

Leave a comment