उन्हाळ्यात जांभूळ खायचे फायदे जाणून घ्या….

0

आपल्या आकाराने लहान परंतु जांभूळ खाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत जे तुम्हला कदाचित माहित असेल. जांभूळ हे फळ मूळ दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात आढळून येतात. जांभूळ या फळाचे शास्त्रीय नाव ‘सायझिजियम क्युमिनी’ आहे. जांळामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्व मोठ्या प्रमाणत आढळून येतात. या फळाची पाने सुगंधी आणि गुणकारी बीज, फळे, फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जात होता अशी माहिती प्राप्त झाली आहे.

जाणून घ्या जांभूळ खायचे फायदे 

  • आपल्या जर मुतखडा झाला असेल तर अशा लोकांनी जांभळाच्या बियांचे पावडर दह्यात मिसळून सेवन करावे.
  • जांभळामध्ये अँटी डायबेटीक गुणधर्म असतात. जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर तयार करा आणि दिवसातून ३ वेळा त्याचे सेवन करा. मधुमेहावर हा अत्यंत चांगला उपाय आहे.
  •  रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर असल्याचेच समजते.
  • पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरते.
  • जुलाब झाल्यास जांभळाच्या बियांची पावडर साखरेत मिसळून दिवसातून २-३ वेळा घ्या.
  • मूळव्याध होऊन रक्त पडत असेल तर अशा वेळी जांभळाचा रस प्यावा.
  • अतिसार आणि अपचन या सारख्या आजारावर जांभळाच्या झाडाची साल अथवा  जांभळाच्या बियांची  पावडर गुणकारी आहे.
Leave a comment