जाणून घ्या कढीपत्त्याचे अनेक गुणकारी फायदे
स्वयंपाक घरात नेहमी वापरला जाणार घटक म्हणजे ‘कडिपत्ता’. पदार्थाला एक विशेष चव आणण्याखेरीज कडिपत्त्याचे अनेक फायदेही आहेत. ते पाहुयात…
– कडिपत्ता हे लोह आणि फॉलिक अॅसिडचा मोठा स्त्रोत आहे. कडिपत्ता अॅनिमिया आजार रोखण्यासही मदत करतो.
– अतिशय मद्यपान करणाऱ्या लोकांच्या जेवणात कडिपत्त्याचा वापर करणं फायदेशीर ठरतं. मद्यपानामुळे शरीरात ऑक्सिडेटिव स्ट्रेस आणि टॉक्सिन्स तयार होत असतात. जेवणात कडिपत्त्याचा वापर फायदेशीर ठरतो.
– कडिपत्त्यामध्ये फायबर असतं. ते रक्तातील इन्सुलिनला प्रभावित करुन ब्लड-शुगर लेवल कमी करण्याचे काम करते.
– कडिपत्ता पचनशक्ती सुरळित करतो. वजन कमी करण्यासाठीही कडिपत्ता फायदेशीर आहे.
– मधुमे आणि सतत वजन वाढणाऱ्या लोकांसाठी कडिपत्ता खाणं अतिशय गुणकारी आहे.
– कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कडिपत्ता प्रमुख भूमिका बजावतो.
– तेलात कडिपत्त्यांची पानं उकळवून ते तेल केसांना लावल्याने केस गळती कमी होण्यासही मदत होते.
महत्वाच्या बातम्या : –
दुधाचे फायदे आणि इतर पदार्थांपासून उत्पादित होणाऱ्या दुधाबाबत शास्त्रीय अभ्यास करावा – केंद्र सरकार
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीची ५ क्विंटल आवक
आज होणारी ट्रॅक्टर मार्चवरील सुनावणी तहकूब
स्वीट कॉर्न लागवडीसाठी अनुदान कसे मिळवायचे ते जाणून घेऊया