सामाजिक मागासलेपणाचा महिला क्षय रुग्णांवर होणारा परिणाम

0
मराठवाडा आणि अनुशेष हे समीकरण कायमच राहिलं आहे.त्यातूनच पुढे आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विषमता निर्माण होते आणि परिणामतः त्याचे पडसाद समाजातील सर्व वर्गाला भोगावे लागतात. याच अनुषंगाने मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील क्षय रुग्णांचा अभ्यास केल्यास या आजाराशी निगडित काही सामाजिक प्रश्न उभे राहिले, तसेच काही सामाजिक बंधन ज्यामुळे क्षयरोग तपासणी आणि उपचाादरम्यान काय समस्या जाणवतात याची जाणीव झाली.बरोबरच  स्त्री – पुरुष, समाजातील विविध वयोगट आणि क्षयरोगाचा आर्थिक बाबींवर कसा परिणाम होण्याची शक्यता आहे हे जाणवले.
जागतिक स्तरावर स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये क्षयरोगाचे रुग्ण जास्त आढळून येतात . तीच गोष्ट हिंगोली येथे ही जाणवली. मागील वर्षातील चारही तिमाही ची आकडेवारी पाहिल्यास हे जाणवते की एकूण रुग्ण संख्येपैकी 790 हे पुरुष आणि 525 या स्त्रिया आहेत. या आकडेवारीचा विचार करता 60% पुरुष आणि 40 % स्त्रिया हे क्षयरोग बाधित आहेत.
संपूर्ण दृष्टीने विचार केल्यास एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की, महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जास्त आहे, यामागील कारणांचा विचार केल्यास काही महत्वाचे मुद्दे समोर आले. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे  सरकारी धोरणामध्ये महिला – केंद्रित धोरण नाही..तसेच आरोग्य क्षेत्रातील स्त्रियांची कमी संख्या. ज्याचा परिणाम आजही ग्रामीण भागातील महिला, पुरुष डॉक्टरसमोर आपला प्रश्न तितकासा व्यवस्थित मांडू शकत नाहीत.ज्यामुळे निदान करण्यास अडथळा निर्माण  होतो. दुसरे कारण: कुटुंबात स्त्रीच्या आरोग्याबद्दल असलेली उदासीनता. जेथे पुरुष प्रारंभिक अवस्थेमध्ये रोगावर उपचार घेतात मात्र याउलट स्त्रिया रोगाची तीव्रता वाढल्यानंतरच तपासणी साठी जातात. तीन: पुरुषांनी कामानिमित्त स्थलांतर  केल्यानंतर कामाचा येणारा अतिरिक्त ताण ज्यामुळे तपासणीसाठी जाण्यापासून ते उपचारपर्यंत लागणारा वेळ.तसेच सर्वसामान्य लोकांच्या मनात असणाऱ्या समजूती – गैरसमजुती ज्यामुळे स्त्रिया दवाखान्यात जातच नाहीत आणि परिणामी त्याचा क्षयरोग एक्स डी आर म्हणणे बऱ्याच पुढच्या अवस्थेमध्ये रूपांतर होऊन मृत्यूच प्रमाण वाढत.याबाबतीत बिहार मधील एका  एनजीओ मध्ये काम करण्याऱ्या अधिकाऱ्याशी बोलणं झालं त्यात त्यांनी या बाबींवर दुजोरा दिला.
तसेच स्त्रियांमध्ये फुफ्फुसाव्यतिरीक्त होणाऱ्या क्षयरोगाच प्रमाण जास्त असत जो कळून येण्यासही जास्त वेळ लागतो.त्यामुळेही  संक्रमणाचा धोका वाढतो.
क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी सरकारने क्षयरोग तपासणी आणि निदान करून  घेण्यास लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी दरमहा 500 रुपये देण्याची योजना सुरू केली आहे.मात्र याबाबतीत एका महिलेशी बोलताना तिने सरकार देत असलेल्या मदतीवर प्रश्न उभा केला –  आजच्या जमान्यात 500 रुपयांत काय होते? असा तिच्या बोलण्याचा सुर होता.
हा प्रश्न वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर मांडला असता ते म्हणाले की, ” सरकार तर आधी काहीच देत नव्हते,आता तरी 500 रुपये देते” या बाबींवरून सरकारी यंत्रणा राबवत असणाऱ्या योजनांमुळे एक उपकाराची भाषा येत असल्याचे जाणवले.मात्र त्याच जोडीला या 500 रुपये देण्याच्या योजने नंतर रुग्णांमध्ये उपचार घेण्यासंबंधी असणारी नियमितता वाढली.हेही त्यांनी प्रकर्षाने नमूद केले.
तसेच हिंगोलीमध्ये  लोक 70% लाकडाचा इंधन म्हणून उपयोग करतात जे क्षयरोगाचा धोका वाढवण्यास हेही कारणीभूत ठरू शकतं म्हणजे हिंगोली मध्ये उज्वला सारख्या योजना प्रामुख्याने राबवण्याची गरज आहे.
एकूणच स्त्रियांचे आरोग्य हा एक कळीचा मुद्दा आहे आणि त्यात क्षयरोगासारख्या आजाराचे न दिसते लक्षण म्हणजे धोक्याचे प्रमाण वाढण्यास हा घटक कारणीभूत ठरतो.त्यामुळे सरकारने प्राधान्याने लिंग संवेदनशीलता आणि लिंग समानता या घटकांवर प्रयत्न वाढवण्याची गरज आहे.विशेष म्हणजे  हिंगोली सारख्या अविकसित भागात महिलांमध्ये सर्व स्तरावर जागरूकता निर्माण करणे प्रामुख्याने गरजेचे आहे.
-पुजा नायक
(Survivors Against TB hi organization)
लेखिका या संस्थेद्वारे क्षयरोगावर संशोधन व माहिती संकलन करत आहे
लेखिकेचा संपर्क-+919960129947
Leave a comment