बर्ड फ्लूसंदर्भात गैरसमज व अफवा पसरवू नका – उद्धव ठाकरे

0

एकीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोन व्हायरसच्या संकटाचा सामना करत असताना, आता दुसऱ्या आजाराचे संकट उद्भवले आहे. महाराष्ट्रात पक्षी व कोंबड्यामध्ये बर्ड फ्लू आढळल्याने सरकारवर हाय अलर्टवर आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने आढावा बैठक घेतली.

बर्ड फ्लूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले. त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे बर्ड फ्लू संक्रमण आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात निर्देश दिले.

या रोगाचे तात्काळ निदान होण्याकरीता राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागासाठी जैवसुरक्षास्तर 3 ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध  करून देण्यात येईल. त्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. ज्या भागात बर्डफ्लू रोगाची लागण नाही अशा भागात अंडी व मांस 70 डीग्री पेक्षा जास्त तापमानात शिजवून खाल्ल्यास काहीही धोका नसल्याचे नमूद करून याबाबत गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या : –

पुण्यातून कोरोना लसीची पहिली खेप रवाना

देवेंद्र फडणवीस यांनी बर्ड फ्लू बाबत व्यक्त केली चिंता

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत २० लाख अपात्र लाभार्थ्यांना 1,364 कोटी रुपये दिले: आरटीआय

आंध्र प्रदेशातील टोमॅटोच्या शेतकर्‍यांचे 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान

उन्हाळी हंगामासाठी योग्य शिफारशीत भुईमूग जातींची निवड

 

Leave a comment