मूळव्याध्यावर गुणकारी असे कवठाचे फळ

0

कवठ हा वृक्ष मूळचा दक्षिण भारतातला आहे. कवठ हा काटेरी व पानझडी प्रकारचे वृक्ष आहे. भारतासहित पाकिस्तान, श्रीलंका, जावा, ब्रह्मदेश, बांगला देश इ. प्रदेशांत कवठाचे वृक्ष आढळतात. या झाडाची उंची ६-९ मी. असते. याची पाने संयुक्त, विषमदली, पिसासारखी एकआड एक, चकचकीत व गुळगुळीत असतात. दले ३-९, समोरासमोर, बिनदेठांची, अखंड व गोल टोकाची असून उन्हाळ्यात गळून पडतात. या झाडाच्या खोडाची साल पांढरट-हिरवी किंवा काळी, खरबरीत, जाड व भेगाळलेली असते.

फेब्रुवारी ते एप्रिल या काळात या झाडांच्या फांद्यांच्या टोकास विरळ परिमंजरीवर लहान आकाराची फिकट लाल व आखूड देठांची फुले येतात. मोहर आल्यानंतर साधारणत: २-३ महिन्यांनी फळे तयार होतात. या फळांची साल कठीण असते. या फळांचा रंग हा करडा असतो आत मध्ये मृदू गर व लांबट बिया असतात. कवठाचे पिकलेले फळ चवीला आंबट-गोड व तुरट असते.

कवठामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. ‘क’ जीवनसत्त्वासह लोह, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, फायबर असे सर्व पौष्टिक मूलद्रव्य कवठामध्ये असतात.
या फळांच्या गरापासून खाण्यासाठी चटणी, मुरंबा, जेली, बर्फी बनवतात. हे फळ पित्ताचे शमन करण्यास मदत करते व यामुळे भूक वाढते. कवठ कंठाची शुद्धी करते, दमा, क्षयरोग, रक्‍तविकार, उलटी, वातदोष, श्रम, उचकी, विष, तृष्णा, ग्लानी वगैरे तक्रारीत हितकर असते. तिन्ही दोषांचे संतुलन करते. शौचासह आव, मूळव्याध वगैरे त्रासावर कवठाचा बिया व धागे काढलेला गर ताकासह घेण्याचा उपयोग होतो.

फळाची साल पित्तावर उपयुक्त असते; तसेच ती कातडी कमाविण्यासाठी व रंगविण्यासाठी वापरतात. वाळलेली फुले उकळून त्यांपासून रंग मिळतो. बियांतील तेल खाजेवर लावतात. पाने सुवासिक, वायुनाशी व अंगावर पित्त उठल्यास त्यांचा रस लावतात.

लहान मुलांना कृत्रिमरीत्या बनवलेल्या जॅमऐवजी कवठाच्या गरात गूळ घालून मिक्सरमधून बारीक करून तयार झालेला जॅम दयावा. यामुळे शरीरातील रक्ताचे व कॅल्शिअमचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते.

कवठाची सुगंधीत पाने स्वच्छ धुऊन त्याची मेथीच्या भाजीसारखी भाजी बनवतात किंवा ही पाने पिठामध्ये मळून थालिपीठे बनवता येतात.या झाडापासून डिंक हि मिळतो हा डिंक अर्धपारदर्शक, तांबूस भुरा असतो. बाभळीच्या डिंकास पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

महत्वाच्या बातम्या : –

द्राक्ष खाण्याचे फायदे आणि नुकसान

बेलाचे सरबत पिण्याचे काही फायदे व नुकसान

लिंबाचे लोणचे खाण्याचे 4 मोठे फायदे

आंबा मोहोर संरक्षण फवारणी

भातावरील किडी आणि प्रभावी नियंत्रण

Leave a comment