राज्यात रुग्णवाढीने चिंता, गेल्या २४ तासात ५,४२७ रुग्णांची वाढ

0

राज्यात कोरोनाची दैनंदिन रुग्णवाढ आता चिंताजनक बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. गेल्या २४ तासात ५,४२७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे .

बुधवारी म्हणजेच १७ फेब्रुवारी २०२१ रोजी ४,७८७ नवीन रुग्णांचे निदान झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती व अकोला जिल्ह्यात शनिवार, रविवार असे दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश काढण्यात आला असला तरी प्रत्यक्षात जमावबंदी असेल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विदर्भातील रुग्णसंख्येत अचानक २० टक्के वाढ झाल्याची माहिती देण्यात आली आहे. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर शेकडो विवाह झाले, त्यामुळे या भागात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. अकोला जिल्ह्याचा कोरोना रुग्णसंख्येचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा ३२ टक्के असून, अमरावती जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ४८ टक्के आहे, तर यवतमाळ जिल्ह्याचा दैनंदिन आणि आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर १५ टक्के आहे. संपूर्ण राज्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा ८.८ टक्के एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.४८ टक्के एवढा आहे.

मागील सात दिवसात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांपैकी नागपूर व वर्धा जिल्ह्यांत रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. नागपूर जिल्ह्यात ३,७८०, तर वर्धा जिल्ह्यात ५०३ रुग्णांची नोंद झाली आहे.

महत्वाच्या बातम्या : –

मायकोरायझा म्हणजे नक्की काय जाणून घ्या…

मोहरी बियाणे पेरणी आणि कापणी कसे करावे? जाणून घ्या

आता तहसील किंवा पंचायत कार्यालयात जाण्याची गरज नाही, अशा प्रकारे घरबसल्या भरा जिमीचे भाडे

पुढचे तीन दिवस ‘या’ जिल्ह्यात गाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

बटाटा पिकावरील महत्त्वाच्या रस शोषणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

Leave a comment