शेती – सुर्यफुल हे महाराष्ट्रातील महत्वाचे तेलवर्गीय पिक आहे. हे पिक कमी कालावधीत येणारे असून सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येणारे पीक आहे. हे पीक पावसाचा ताण ब-याच प्रमाणात सहन करू शकते. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित व संकरित वाणाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे._
जमीन
सूर्यफूल लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. आम्लयुक्त व पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
पूर्वमशागत
जमिनीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या-आडव्या दोन ते तीन पाळ्या घ्याव्यात.
पेरणीची वेळ
उन्हाळी हंगामाकरिता फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये पेरणी करावी. मात्र आपत्कालीन परिस्थितीत व संरक्षित सिंचनाची व्यवस्था असल्यास फेब्रुवारीच्या दुस-या पंधरावड्यात पेरणी करता येते.
वाणसंकरित वाण
पिकेव्हीएसएच-२७, पिकेव्हीएसएच-९५२, केबीएसएच-१, केबीएसएच-४४, डिआरएसएच-१, एमएसएफएच-८, एमएसएफएच-१७, फुले रविराज, एलएसएफएच-१७१, नारी, एनएच-१, बीएसएस-११, एपीएसएस-११. सुधारित वाण : शारदा, आनेगीरी, नारी-६, परभणी कुसुम, परभणी-80, एसएस.५६ मॉडर्न, सुर्या, सनराइज सिलेक्शन, भानु
आंतरपीक
_आंतर पीक पद्धतीमध्ये भुईमूग + सूर्यफूल (६:२,३:१) या प्रमाणात ओळीत पेरणी करावी.
पेरणीचे अंतर मध्यम ते खोल जमीनीसाठी ४५ x ३0 सें.मी.
भारी जमिनीसाठी ६0 × ३0 सें.मी.
संकरित वाणसाठी 60 × ३0 सें.मी. पेरणीचे अंतर ठेवावे.
पेरणी पद्धत
जिरायती सूर्यफुलाची पेरणी दोन चाड्यांच्या पाभरीने करावी. म्हणजे बियाणे आणि खत एकाच वेळी पेरता येईल. बियाणे ५ सें.मी. पेक्षा खोल पेरू नये. पेरणीनंतर पाणी देण्याच्या दृष्टीने सारे पाडून घ्यावेत. बागायती
बियाणे
सूर्यफुलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे ८ ते १० किलो, तर संकरित वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे प्रती हेक्टरी वापरावे.
बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी मर रोगाच्या प्रतिबंधासाठी २ ते २.५ ग्रॅम थायरम अथवा काबॅन्डॅझिम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम या बुरशी नाशकाची प्रती किलो बियाण्यांसाठी बीजप्रक्रिया करावी तसेच केवडा रोगाच्या प्रतिबंधासाठी ६ ग्रॅम मेटॅलॅक्झील ३५ एसडी, विषाणूजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यू ए ५ ग्रॅमची बीजप्रक्रिया करावी त्याच प्रमाणे अॅझेंटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रती किलो बियाण्यांसाठी वापरावे.
रासायनिक खते
पेरणीपूर्वी प्रती हेक्टर २.५ टन शेणखत अथवा कंपोस्ट खत शेतामध्ये चांगले मिसळवून घ्यावे, बागायती पिकास हेक्टरी ६० किलो नत्र, ३0 किलो स्फुरद व ३0 किलो पालाश द्यावे व उरलेल्या ३0 किलो असलेल्या जमिनीसाठी प्रती हेक्टरी २0 किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खत, शेणखत अथवा कंपोस्ट खतातून द्यावे.
आंतरमशागत
पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी दोन रोपांतील अंतर ३० सें.मी. ठेवून विरळणी करावी. पेरणीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी करावी. तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर २0 दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४o दिवसांनी करावी.
पाणी व्यवस्थापन
सूर्यफुलास संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे असते. आपल्याकडे असलेल्या पाण्याची उपलब्धता यावरून पाणी देण्याचे नियोजन करावे. जर आपल्याकडे एक पाळी देण्याइतके पाणी असेल तर आपण पीक फुलो-यावर असताना म्हणजे पेरणीनंतर ५५ ते ६५ दिवसांनी पिकास पाणी द्यावे. जर आपल्याकडे दोन पाळी देण्याइतके पाणी असेल तर आपण फुलकळी अवस्था म्हणजे पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी व पीक फुलो-यावर असताना म्हणजे पेरणीनंतर ५५ ते ६५ दिवसांनी पिकास पाणी द्यावे. जर आपल्याकडे तीन पाळी देण्याइतके पाणी असेल तर आपण फुलकळी अवस्था म्हणजे पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी व पीक फुलो-यावर असताना म्हणजे पेरणीनंतर ५५ ते ६५ दिवसांनी तसेच दाणे भरण्याची अवस्था म्हणजे पेरणीनंतर ६५ ते ७५ दिवसांनी पिकास पाणी द्यावे. पीक फुलोरा अवस्धेत असताना तुषार सिंचन करु नये फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळे राळतात व परिणामी उत्पादनात घट येते.
पीक संरक्षण
_विषाणूजन्य रोगाचा प्रसार सशोषक फुलकिंड्यांमार्फत होतो. पुलकिंडे नियंत्रणासातीं इमिडाक्लोप्रोड़ २०० एस.एल. ३ ते ५ मेिं लीं. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात पेरणींनंतर ११ किंवसाच्या अंतराने तीन वेळा फवारण्या कराव्यात. मावा व तुङ्तुडे यांच्या नियंत्रणासाठी डायमीर्थोएट ३० टक्के प्रवाही २० मीली. प्रती १० लीटर या प्रमाणात फवारावे. घाटेअळीच्या नियंत्रणासाठी प्रोपेनोफाँस ५० ईसी २० र्मिली. प्रती १० लिटर किंवा क्वीनाॅलफॉस ३६ टक्के प्रवाही १५ मी.ली. प्रती १० लिटर किंवा धायामेथेक्झाम २५ टक्के ड्ब्लूजी ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळवून फवारणी करावी. केसाळ
अळीच्या नाश करावा किंवा काबींख्रल १० टक्के भुकटी २५ किंली प्रती हेक्ट्री या प्रमाणात धुरूळावी. सूर्यफुलावरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, घाटे अळी यांच्या र्नियंत्रणासाठी एवप्नपीकाही (HNP५) या विषाणूजन्य कीटकनाशकाची ५०० मी.ली. प्रती हेक्टरी या प्रमाणात फवारणी करावी तसेच क्रायसोपर्ला कारर्निया, लेंडीबर्ड विंठल यांच्या २०,000 भळ्या सशोषण करणा-या किंडीच्या नियंत्रणाकरिता प्रादुर्भाव दिसताच शैतात सोडाव्यात._
काढणी
सूर्यफुलाची पाने, वैन व फुलाची मागील बाजू पैिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी. कणसे चांगली वाळवून नंतर मळणी करावी.
उत्पादन
कोरडवाहू क्षेत्रामध्ये प्रती हेक्टर ८ ते १० क्विंटल व बागायती क्षेत्रांमध्ये प्रती हेक्टरी १५ ते २० क्विंटल उत्पादन र्मिळते.
उत्पादनवाढीसाठी पुढील महत्वाच्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे
पीक फुलो-यात असताना सकाळी ४ ते ११ या वेळेत हाताला तलम कापड़ गुडालून पुलाच्या तबकावरुन एक विसा भाड़ फुलाया बाहेरील कडेपासून मध्यापर्यंत हळुवार हात फिंखावा. यामुळे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.
सूर्यफुलाच्या फुल उमलण्याच्या अवस्थेत व त्यानंतर भान किंवसांनी २ ग्रॅम बोरॅक्स प्रती लीट्र पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्याचे वजन वाढते.
सूर्यफूल पिंकाची फेरपालट करावी. सूर्यफुलाची मुळे जर्मनीत खोलवर जातात. दर वर्षी एका जर्मिनीत वारंवार हे पीक घेतल्यास जर्मनीचा पोत बिंघडतो, तसेच रोग व किंडीचा प्रादुर्भाव वाळतो. त्यासाठी कमीतकमी ३ वर्षे तरी त्याच जर्मनीत सूर्यफुलाचे पीक घेऊ नये.
परागीभवन होण्यासाठी प्रती हेक्ट्री ४ ते ५ मधमाश्याच्या पेठ्या ठेवल्यात. पीक फुलो-यात असताना कोठकनाशकांची फवारणी करु नयें क्यामथ्ये मधमाश्यांचीं क्रियाशीलता कमी होते.
विनोद धोंगडे, नैनपुर